डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा; महाराष्ट्रात नाही तर भारतातील 'या' राज्यात उभारलाय

Mahaparinirvan Din 2024: जाणून घेवूया  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा भारतातील कोणत्या राज्यात आहे. 

| Dec 05, 2024, 23:11 PM IST

Worlds Tallest Statue of Ambedkar :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. जगभरात ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा महाराष्ट्रात नाही तर आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये उभारण्यात आला आहे. जाणून घेऊया या पुतळ्याविषयी.

1/7

केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आणि स्मारक आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा भारतात उभारण्यात आला आहे. 

2/7

स्वराज्य मैदानाचा हा संपूर्ण परिसर पय्टनस्थळ म्हणून विकसीत करण्यात आला आहे. पुतळ्यासह येथे एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर आंबेडकरांचा जीवनपट दाखवण्यात येतो.   

3/7

 'मेड इन इंडिया' च्या माध्यमातून हा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा बांधण्यासाठी 400 टन स्टील वापरण्यात आले आहे.    

4/7

404.35 कोटी रुपये खर्चून पुतळा उभारण्यात आला आहे. 18.81 एकर अशा भव्य परिसरात हा पुतळा उभारण्यात आला आहे. 

5/7

स्वराज्य मैदानावर आंबेडकरांचा सर्वात उंच 85 फूट असा हा पुतळा उभारण्यात आला आहे.   

6/7

या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आले आहे. या पुतळ्याचा जगातील सर्वात उंच 50 पुतळ्यांच्या यादीत समावेश केला जाणार आहे.   

7/7

 मुंबईतील इंदू मिल इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. मात्र, त्याआधीच आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.