Most Dangerous Airports: 'या' 5 विमानतळांवरुन प्रवास करायला हवं वाघाचं काळीज! शेवटचे 2 फोटो पाहाच

Most Dangerous Airports In The World: विमानतळांना भेट दिल्यावर त्यांची भव्यदिव्यता आपल्याला थक्क करते. मात्र हे सगळ्याच विमानतळांबद्दल म्हणता येणार नाही. अशीच काही तुम्हाला थक्क करुन सोडतील अशी विमानतळं आपण आज पाहणार आहोत. या विमानतळांवरुन प्रवास करायला वाघाचं काळीज लागतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चला तर जाणून घेऊयात या विमानतळांबद्दल...

Swapnil Ghangale | Dec 19, 2024, 14:51 PM IST
1/13

dangerousairport

जगातील सर्वात धोकादायक विमानतळं कुठे आहेत आणि त्यांची वैशिष्ट्यं काय आहेत हे एकदा पाहाच. यादीमधील शेवटच्या विमानतळाचे फोटो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर पाहूयात ही यादी...

2/13

dangerousairport

सर्वात वेगवान आणि लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हवाई मार्ग हा सर्वोत्तम मार्ग असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच जगभरातील कोट्यवधी प्रवासी हवाई मार्गाने दरवर्षी प्रवास करतात.  

3/13

dangerousairport

विमानप्रवास म्हटल्यानंतर विमानतळं ही ओघाने आलीच. जगात अनेक सुंदर विमानतळं आहेत. या विमानतळांचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र आज आपण जगातील पाच अशा विमानतळांबद्दल जाणून घेणार आहोत की जे फारच धोकादायक आहेत.

4/13

dangerousairport

माले अंतरराष्ट्रीय विमानतळ - मालदीवची राजधानी असलेलं माले विमानतळावर विमान उतरवणं हे फारच आव्हानात्मक समजलं जातं. 

5/13

dangerousairport

माले विमानतळ हे जगातील असं एकमेव विमानतळ आहे की जे खास पद्धतीची रचना आणि खडक वापरुन समुद्रावर बांधण्यात आलं आहे. हे विमानतळ समुद्राच्या किनाऱ्यापासून केवळ दोन मीटरच्या उंचीवर आहे.   

6/13

dangerousairport

हाँगकाँगमधील काई टाक विमानतळ: हाँगकाँगमधील काई टाक विमानतळ फारच धोकादायक मानलं जातं. येथे विमान उतरवणं एवढं धोकादायक आहे की प्रवाशांमध्ये हे विमानतळ काई टाक हार्ट अटॅक या टोपणनावाने ओळखलं जातं. हे विमानतळ 1925 ते 1998 दरम्यान सक्रीय होतं. मात्र हे विमानतळ आता बंद करण्यात आलं आहे.  

7/13

dangerousairport

काई टाक विमानतळच्या दोन्ही बाजूला उंच उंच इमारती आहेत. सामान्यपणे विमानतळाच्या आजूबाजूला उंच उमारतींना परवानगी दिली जात नाही. या विमातनळावरील रन वे सुद्धा फार लहान होता.

8/13

dangerousairport

तेनजिंग-हिलेरी एअरपोर्ट - नेपाळमधील तेनजिंग-हिलेरी एअरपोर्ट या यादीत आहे. हे विमानतळ हिमालयातील डोंगराळ भागात आहे. लुकला शहरामधील या विमानतळाची लांबी केवळ 460 मीटर इतकी आहे.   

9/13

dangerousairport

तेनजिंग-हिलेरी विमानतळाच्या उत्तरेला हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत तर दक्षिणेला 600 मीटर खोल दरी आहे. त्यामुळेच हे विमानतळ जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे.

10/13

dangerousairport

बारा विमानतळ - स्कॉटलँडमधील बारा विमानतळ हे समुद्र किनाऱ्याला लागून आहे. समुद्राला येणाऱ्या भरती-ओहोटीदरम्यान या विमातनळाच्या रन-वेवर पाणी येतं.   

11/13

dangerousairport

बारा विमानतळाला अनेकदा समुद्री वादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळेच येथे उतरणारी आणि उड्डाण करणारी विमानं ही वादळाचा अंदाज घेऊनच उड्डाण अथवा लँडिंग करतात.

12/13

dangerousairport

जूयानको ई इरासकिन एअरपोर्ट: कॅरेबियन बेटांपैकी साबा बेटावर असलेल्या या विमानतळावरुन उड्डाण करणं हे प्रत्येक वैमानिकाला आव्हानात्मक वाटतं.   

13/13

dangerousairport

जूयानको ई इरासकिन एअरपोर्टवर विमान उतरवणं हे नवख्या वैमानिकाचं काम नाही. वैमानिकाची छोटीशी चूक झाली तर विमान थेट समुद्रात जाईल एवढं धोकादायक हे विमानतळ आहे.