महाराष्ट्रातील प्रेरणादायी पर्यटनस्थळ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारे शांतीवन

Mahaparinirvan Din 2024:  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचं संग्रहालय नागपूर नजीकच्या चिंचोली येथे उभारण्यात आले आहे.  

| Dec 05, 2024, 22:39 PM IST

Shantivan Nagpur Dr Babasaheb Ambedkar Memorial Museum :  नागपूर नजीकच्या चिंचोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचे एक आगळे -वेगळे असे संग्रहालय साकारण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वस्तू देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे... आणि हाच वारसा जपण्याचे काम शांतीवन येथील भारतीय बुद्धिस्ट परिषद करीत आहे.

1/7

महाराष्ट्रात एक प्रेरणादायी पर्यटनस्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल वस्तूंचा ठेवा या संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे.   

2/7

राज्य सरकारच्या अनुदानातून आता या ठिकाणी नवीन वस्तू संग्रहालय, ध्यान सधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र,वाचनालय व निवासस्थान तयार करण्यात आले आहे.

3/7

1956 ला नागपुरात पार पडलेल्या धर्मांतरण सोहळ्याची व्यवस्था वामनराव गोडबोले यांनी चोख सांभाळली  होती.

4/7

1983 मध्ये चारशे पेक्षा जास्त वस्तू नानकचंद रत्तू यांनी वामन गोडबोले यांना दिल्या.  

5/7

1956 साली धम्मदीक्षा सोहळ्यातीळ गौतम बुद्धाची मूर्ती,दीडशे कोट,कॅप, हॅट्स, पेन, चिमटे, खुर्ची,छडी आदींचा समावेश आहे.

6/7

बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनी सांभाळून ठेवलेल्या वस्तूंचा येथे संग्रह आहे.

7/7

देशाचं संविधान ज्या टाईपरायटरने लिहिलं तो टाईपरायटर ते इतर दैनंदिन जीवनातील वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्यात.