मुंबई नाही इथे आहे विराट कोहलीचं सर्वात महागडं घर, किंमत तब्बल 800000000 रुपये

Virat Kohli Most Expensive Home : विराट कोहली हा भारताचा महान क्रिकेटर असून त्याने जागतीक क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली हा श्रीमंतीच्या बाबतीतही जगातील टॉप ५ क्रिकेटपटूंच्या यादीत मोडतो. तेव्हा विराट कोहलीच्या भारतातील सर्वात महागड्या घराविषयी जाणून घेऊयात. 

| Dec 19, 2024, 20:05 PM IST
1/7

विराट कोहलीची एकूण संपत्ती ही जवळपास 1 हजार कोटी इतकी आहे. विराटकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यासह भारतातील विविध राज्यात आणि शहरांमध्ये त्याने अनेक प्रॉपर्टीनमध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली आहे. 

2/7

विराट कोहलीची मुख्य तीन घर ही दिल्ली, मुंबई आणि अलिबाग येथे आहे. दिल्ली हे विराटचे जन्म ठिकाण असून तिथेच तो लहानाचा मोठा झाला आणि पुढे जाऊन स्थानिक तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू लागला.   

3/7

काही वर्षांपूर्वी विराट कोहलीने मुंबईच्या वरळी येथील ओमकार 1973 या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर घर खरेदी केले. विराटच्या मुंबईतील या घराची किंमत ही जवळपास 34 कोटी इतकी असून हे घर खूपच आलिशान असून त्याच इंटेरिअर हे मोर्डेन आहे. 

4/7

विराट कोहलीने गेल्यावर्षी मुंबई जवळील अलिबाग येथे फार्म हाऊस खरेदी केलं. हे फार्म हाऊस अनेक एकर जमिनीवर बांधण्यात आलं असून याची किंमत जवळपास 19 कोटी इतकी आहे. काही महिन्यांपूर्वी कोहलीने स्वतः अलिबाग येथील फार्म हाऊसचा व्हिडीओ शेअर केला होता.   

5/7

विराट कोहलीचं भारतातील सर्वात महागडं घर हे दिल्लीमध्ये आहे. याची किंमत जवळपास 80 कोटी असल्याचं बोललं जातं. येथे विराट कोहलीचं संपूर्ण कुटुंब राहत.   

6/7

विराट कोहलीच दिल्ली येथील आलिशान बंगला हा गुरुग्राम येथील डीएलएफ फेज 1 मध्ये आहे. बंगल्याच्या बाहेर 'कोहलीज' नावाची मोठी पाटी असून या घराचं इंटेरिअर देखील मोर्डेन आहे. विराटच्या या आलिशान बंगल्या बाहेर येऊन त्याचे चाहते फोटो काढतात.   

7/7

विराट कोहीलच्या कमाईची अनेक स्त्रोत आहेत. विराट बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टच्या टॉप ग्रेडमध्ये आहे, बीसीसीआयकडून त्याला वर्षाला 7 कोटी रुपये दिले जातात. याशिवाय वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यातून त्याची दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई होते. याशिवाय आयपीएल फ्रँचाईज रॉयल चॅलेंजर्स त्याला वर्षाला 15 कोटी रुपये देते. क्रिकेट मैदानाबाहेरही विराट कोट्यवधी कमावतो. जाहाराती आणि ब्रँड एन्डोर्समेंटच्या माध्यमातूनही त्याची तगडी कमाई होते. स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात विराट कोहलीने तब्बल 847 रुपयांची कमाई केली आहे.