PHOTO: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिन आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच स्वीकारला. शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचा अभ्यास केलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? काय आहे यामागचं कारण? 

3 लाख 65 हजार जनसमुदायासोबत डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीत बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू म्हणून धर्माला आलेल्या बाबासेहबांनी मी हिंदू म्हणून मरणार नाही असं निश्चित केलं होतं. बाबासाहेबांनी शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्माचा अभ्यास केला होता. पण हे धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला? यामागचं कारण काय? 

(फोटो सौजन्य - https://brambedkar.in/

1/8

3 लाख 65 हजार जनसमुदायासोबत डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीत बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू म्हणून धर्माला आलेल्या बाबासेहबांनी मी हिंदू म्हणून मरणार नाही असं निश्चित केलं होतं. बाबासाहेबांनी शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्माचा अभ्यास केला होता. पण हे धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला? यामागचं कारण काय? 

2/8

मुस्लिम धर्म का स्वीकारला नाही?

इस्लामला हिंदू धर्माप्रमाणेच मानले जात होते. जिथे अस्पृश्यता ही एक व्यापक समस्या होती. शशी थरूर त्यांच्या आंबेडकरांच्या चरित्रात लिहितात की डॉ. आंबेडकरांनी कदाचित इस्लामला फारसे महत्त्व दिले नाही कारण ती एक 'बंद धार्मिक व्यवस्था' होती आणि आंबेडकरांनी मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यातील 'भेदभाव समजून घेण्यास' विरोध केला होता. तसेच 1947-48 मध्ये पाकिस्तानात दलितांवर अत्याचार करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री आंबेडकर यांनी विरोध करत निंदा केली. तसेच अनुसुचित जातीच्या लोकांना सांगितलं की, पाकिस्तानी मुसलमान त्यांचे मित्र नाही. यानंतर ते मुस्लिम धर्म स्वीकारतील अशी शक्यताच नव्हती.  (फोटो सौजन्य - https://brambedkar.in/) 

3/8

ख्रिश्चन धर्माबाबत?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अशीच काहीशी भावना ख्रिश्चन धर्माशी निगडीत होती. ख्रिश्चन धर्माने बाबासाहेबांना फार आकर्षित केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की, ख्रिश्चन धर्म अन्यायाविरोधातील लढाईत असमर्थ राहिले. भारतावर ब्रिटन लोकांची पकड होती, यामुळेही बाबासाहेबांचा याला विरोध होता.  (फोटो सौजन्य - https://brambedkar.in/) 

4/8

शिख धर्माबाबत काय प्रतिक्रिया

समतावादी दर्शनामुळे बाबासाहेब आंबेडकरांना तो जास्त आकर्षित वाटत असे. 1935 मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक रुपात धर्म परिवर्तनाची धमकी दिली. तेव्हा त्यांनी फार गंभीरपणे याचा विचार केला. धर्म परिवर्तनासाठी सगळ्यात चांगला धर्म कोणता ठरेल असा विचार करताना एक मुद्दा असा देखील होता की, त्यांना हिंदू संस्कृतीमधूनही बाहेर जायचं नव्हतं. त्यामुळे शीख धर्म त्यांनी निश्चित केला होता. पण त्या दरम्यानच बाबासाहेबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शीख धर्मातही स्पृश्य अस्पृश्याची भावना अतिशय गंभीर होती. 

5/8

बौद्ध धर्म का भावला?

मुस्लिम, ख्रिश्न आणि शीख धर्माचा विचार केल्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या समोर एकच धर्म राहिला, तो होता बौद्ध धर्म. बौद्ध धर्माबाबत आंबेडकरांना सुरुवातीपासून आकर्षण बोतं. दलितांना हिंदू व्यवस्थेत कधीच समान दर्जा दिला गेला नाही. येथे जन्माच्या आधारावर सामाजिक वर्गीकरण करण्यात आले. बौद्ध धर्म सगळ्याच बाबतीत महत्त्वपूर्ण मानलं गेलं. 

6/8

कधी केली घोषणा?

मे 1956 साली डॉ. आंबेडकरांनी अशी घोषणा केली की, ते कुटूंब आणि समर्थकांच्या उपस्थिती याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्म स्वीकारणार. धर्म परिवर्तनाच्या पूर्व संध्येला बाबासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. 

7/8

बौद्ध धर्म स्वीकारण्याच कारण काय?

बौद्ध धर्माचा उगम भारतीय भूमीवर झाला आणि तो भारतीय संस्कृतीचा एक अस्सल भाग आहे. मला गौतम बुद्धांच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करायचे आहे आणि बौद्ध धर्म, हीनयान किंवा महायान या दोन परस्परसंबंधित पंथांमधील वादात अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही.

8/8

धर्म परिवर्तनाच्या दिवशी काय झालं??

4 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमीवर उत्तर प्रदेशात राहणारे ज्येष्ठ बौद्ध संन्यासी भिक्षु चंद्रामणीने डॉ. भीमराव आंबेडकर यांना बौद्ध धर्माने दीक्षित केलं. याच दिवशी दसरा हा सण देखील साजरा झाला. आंबेडकर यांनी पांढरे रेशमी धोतर आणि अंगरखा परिधान करून, भिक्षूसमोर 'त्रिरत्न' आणि 'पंचशील' म्हणत. बुद्धाच्या प्रतिमेसमोर साष्टांग दंडवत उभे राहिले आणि पुतळ्याच्या पायावर पांढरे कमळ अर्पण केले. आणि त्यामुळे आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.