Fat Loss : जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने चरबी मेणासारखी वितळते का? काय आहे यामागील सत्य?

Water Consumption For Fat Loss Myth or Fact : पाणी हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे, वारंवार डॉक्टर सांगत असतात. अगदी प्रत्येक रुग्णांना डॉक्टर औषधांसोबत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. काही तज्ज्ञांनुसार वजन कमी करण्यासाठी जास्त जास्त पाणी प्यायला हवं. या किती तथ्य आहे, हे जाणून घेऊयात. 

Dec 02, 2024, 14:23 PM IST
1/7

वजन कमी करण्यासाठी आपल्याला कमी कॅलरी घ्यावे लागते. त्यासोबत व्यायाम गरजेचा असतो. तरच शरीरातील चरबी कमी होते. त्यासोबत पाण्याचाही महत्त्वाचा वाटा असतो, असं तज्ज्ञ म्हणतात. जास्त पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते, यात तथ्य आहे. फक्त पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहिती असायला हवी. 

2/7

हार्वर्डच्या एका अहवालात असं स्पष्ट करण्यात आलंय की, पाणी प्यायल्याने वजन कमी करणं सोपं होतं. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. तर हा उपाय नियमित पाळल्यास याचा परिणाम तुम्हाला लवकर होतो. 

3/7

वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ खूप महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायला हवं. तर दिवसभरात कमी प्रमाणात पाणी प्यायला हवं. तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याची गरज नसते. 

4/7

तज्ज्ञ सांगतात की, जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग तुम्हाला कमी जेवण जातं. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायला हवं. असंही लक्षात आलंय की, अनेक लोक भुकेसाठी तहान चुकवतात आणि जास्त अन्न ग्रहण करतात. याचा परिणाम वजन वाढतं. 

5/7

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्याने चयापचय क्रिया सुधाण्यास मदत मिळते. यामुळे कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत मिलते. ज्यामुळे वजन कमी होतं, पण लक्षात ठेवा की फक्त पाणी तुमचं वजन कमी करू शकत नाही. उच्च फायबर आहार आणि कमी कार्बोहायड्रेटसोबत व्यायामची गरज असते. 

6/7

एका प्रौढ व्यक्तीला दिवसातून 8-10 ग्लास म्हणजे सुमारे 2-3 लिटर पाणी पिण्याचा प्यायला हवं असं तज्ज्ञ सांगतात. 

7/7

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसाला लिटरपर्यंत पाणी प्यायला हवं, असं तज्ज्ञ सांगतात. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)