Komaki Ranger पासून Ola S1 Pro पर्यंत 'या' आहेत देशातल्या टॉप टू ई-व्हीलर्स

मुंबई : पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आणि वाढत्या महागाईवर योग्य उपाय म्हणून ईलेक्ट्रिक टू व्हीलरचा वापरण्याचा कल सर्वसामान्य लोकांचा आहे. भारतातील टॉप 5 बेस्ट इलेक्ट्रिक टू व्हीलरची (Top 5 Electric Two Wheelers) माहिती सांगणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) आणि इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) दोन्हींचा समावेश आहे.

Sep 10, 2022, 16:38 PM IST
1/5

Komaki Ranger

कोमाकी रेंजर ई-बाईकमध्ये 3.6kWh ची बॅटरी उपलब्ध असून कंपनीच्या दाव्यानुसार एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 220km च्या रेंजमध्ये धावू  शकते. या ई-बाईकमध्ये 4kW BLDC मोटर उपलब्ध आहे. त्याचबरोबर, या बाईकची टॉप स्पीड 80kph आहे. Komaki Ranger या ई-बाईकची किंमत 1.85 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.  

2/5

Ola Electric S1 Pro

भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या Ola S1 Pro या ई-स्कूटरमध्ये 8.5kW मोटर उपलब्ध आहे आणि त्यासोबतच याची टॉप स्पीड 115kph इतकी आहे. त्यासोबतच, यास्कूटरमध्ये 4kWh बॅटरी पॅक दिलं आहे. कंपनीनुसार, एका सिंगल चार्जमध्ये 181km पर्यंत धावू शकते. Ola Electric S1 Pro  या स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरु होते.

3/5

Oben Electric Rorr

ओबेन रोर  या ईलेक्ट्रिक बाईकमध्ये 4.4kWh बॅटरी पॅक उपलूब्ध असून कंपनी नुसार एकदा बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक 200km पर्यंत चालू शकते.  Rorr या बाईकमध्ये हॅवॉक, सिटी आणि ईको या तीन राईडिंग मोड्समध्ये उपलब्ध आहे. Oben Electric Rorr या बाईकची किंमत 1.02 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते. 

4/5

Tork Motors Kratos

Tork Motors कंपनीने नुकतचं क्रेटोस या ई-बाईकची डिलीव्हरी सुरु केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 180km पर्यंत धावू शकते. या बाईकमध्ये 4kWh बॅटरी पॅक उपलब्ध असून त्यासोबतच एक्सियल फ्लक्स मोटर देखील मिळतं. सध्या या बाईकला पुणे, मुंबई, हैद्राबाद,चेन्नई आणि दिल्लीतूनच खरेदी केलं जाऊ शकतं. या बाईकची किंमत 1.23 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.    

5/5

Odysse Hawk Plus

Odysse Hawk Plus या ई-स्कूटरमध्ये रिमूव्हेबल 2.88kWh लिथियम-आयन बॅटरी उपलब्ध आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या बॅटरीला एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 170 किमी पर्यंत धावू शकते. त्यासोबतच, यामध्ये  1.8kW मोटर असून या बाईकची टॉप स्पीड 45kph आहे.  Odysse Hawk Plus या स्कूटरची किंमत 1.17 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम)  सुरु होते.