चंदा कोचर दिवसाला किती कमावतात? घ्या जाणून

Apr 04, 2018, 11:01 AM IST
1/5

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

आयसीआयसीआयच्या सीईओ चंदा कोचर सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यावर व्हिडीओकॉनला ३२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या प्रकरणात अनियमितता ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या पतीविरोधातही याप्रकरणी तपास सुरु आहे. सीबीआयनंतर आयकर विभागानेही दीपक कोचर यांना नोटीस पाठवलीये. तसेच सीबीआय लवकरच चंदा कोचर यांचीही चौकशी करणार आहे. चंदा कोचर आणि त्यांच्या पतीवर स्वत:च्या फायद्यासाठी कर्ज दिल्याचा आरोप आहे.   

2/5

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना फोर्ब्स मॅगझीनने जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत सामील केले. चंदा कोचर यांचे मूळ वेतन गेल्या आर्थिक वर्षात १५ टक्क्यांनी वाढवले होते. बँकेच्या वार्षिक रिपोर्टमध्ये चंदा यांची बेसिक सॅलरी वाढवून २.६७ कोटी रुपये करण्यात आली. गेल्या वर्षी हे वेतन २.३१ कोटी रुपये इतके होते.टट    

3/5

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

गेल्या आर्थिक वर्षात कॉन्ट्रॅक्ट बोन, भत्ता, प्रोव्हिडंट फंड, रिटायरमेंट फंड आणि ग्रॅच्युईटी फंड मिळून चंदा कोचर यांचे वेतन ४.७६ कोटीवरुन वाढून ६.०९ कोटी रुपये करण्यात आले. याशिवाय त्यांना २.२ कोटी रुपयांचा बोनसही देण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत भत्ते आणि इतर बाबी मिळून एकूण ४७ टक्के वाढ झाली. या हिशेबाने त्यांनी एका दिवसाला २.१८ कोटी रुपये कमावले.

4/5

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

चंदा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९६१मध्ये राजस्थानात झाला. १३वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण जयपूरमधून झाले. त्यानंतर त्या मुंबईत आल्या. येथील जय हिंद कॉलेजमधून त्यांनी आर्टसमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी करिअर म्हणून फायनान्स फिल्ड निवडले. मुंबईच्या जमनलाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीमध्ये त्यांनी मास्टर डिग्री मिळवली.   

5/5

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

know ICICI Bank CEO Chanda kochhar per day salary

चंदा मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, माझी आई मला सांगायची कि जर महिलांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्या काहीही करु शकतात. या शब्दांनी माझे आयुष्यच बदलून गेले. मी १९८४मध्ये आयसीसीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले. २५ वर्षानंतर त्याच कंपनीत २००९मध्ये पहिली महिला सीईओ बनण्याचा मान मिळाला. यादरम्यान कंपनीने अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या त्या निभावल्या. त्याचाच परिणाम म्हणून देशाच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वात मोठ्या बँकेची सीईओ आहे.