वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles III Coronation: आज 6 मे 2023 रोजी इंग्लंडमध्ये शाही राज्याभिषेक सोहळा (King Charles Crowned) पार पडला आहे. संपुर्ण कुटुंबियांच्या समक्ष प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमेला इंग्लंड राजा-राणी झाले आहेत. त्यांच्या या सोहळ्याला जागातिक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती. 

गायत्री हसबनीस | May 06, 2023, 17:27 PM IST

King Charles III Coronation: मागील वर्षी राणी एलिझाबेन (Queen Elizabeth) यांच्या निधनानंतर इंग्लंडच्या राजघरण्याचा पुढला वारस कोण तर अर्थातच नावं होतं प्रिन्स चार्ल्स यांचे. प्रिन्स चार्ल्स हे कर्तृत्ववान, देखणे आणि रूबाबदार तर आहेत परंतु त्याचसोबत ते लोकप्रिय आहेत. यावर्षी त्यांच्या राज्याभिषेकाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्यांचा राज्याभिषेक सोहळा (King Charles III Crown Ceremony) संपन्न झाला असून या सोहळ्या जगातील नामवंत पाहुण्याची हजेरी लागली होती. आज 6 मे 2023 रोजी प्रिन्स चार्ल्स हे किंग चार्ल्स तिसरे झाले आहेत. 

1/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation

किंग चार्ल्स तिसरे यांचा भव्य राज्याभिषेक सोहळा आज 6 मे 2023 रोजी संपन्न झाला असून या सोहळ्या कुटुंबियांसह जगभरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.  (Photo: @Coronation2023/Twitter)

2/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation news

किंग चार्ल्स व त्यांच्या पत्नी केमेला यांनी इंग्लंडचे राजा आणि राणी म्हणून घोषित करण्यात आले. वयाच्या 74 व्या वर्षी किंग चार्ल्स यांनी राजेपद स्विकारले.  (Photo: @Coronation2023/Twitter)

3/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation live

यावेळी त्यांना हिऱ्यांचा मुकूट चढवण्यात आला. इंग्लंडच्या पारंपारिक राजेशाही पद्धतीनुसार किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळ्या पार पाडला. यावेळी मुकूट स्विकारताना ते भावूक झालेले दिसले.  (Photo: @Coronation2023/Twitter)

4/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation photos

आपल्या कुटुंबियांसह त्यांनी या सोहळ्यालाही उपस्थिती लावली होती. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन आणि नातवंडं उपस्थित होते. प्रिन्स हॅरी यावेळेस अनुपस्थित राहिलेले दिसले.  (Photo: @Coronation2023/Twitter)

5/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation news today

किंग चार्ल्स यांची पहिली पत्नी प्रिन्सेस डायना यांचा घटस्फोट झाला होता त्याच्या दुसऱ्या वर्षी 1997 मध्ये प्रिन्सेस डायना यांचे अपघाती निधन झाले होते.  (Photo: @Coronation2023/Twitter)

6/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation updates

प्रिन्सेस डायना हयात असताना त्या इंग्लंडच्या राणी होतील अशी इंग्लंडच्या जनतेला आणि त्यांच्या चाहत्यांना आशा होती. परंतु त्यांच्या निधनानं ती इच्छा अपूर्णच राहिली.  (Photo: @Coronation2023/Twitter)

7/7

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles third Coronation recent photos

आज किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक होताना पाहून चाहत्यांना प्रिन्सेस डायना यांचीही आठवण आली आहे. त्याबद्दल व्यक्त होतं त्या सोशल मीडियावरून आपली भावना प्रकट केली आहे.  (Photo: @Coronation2023/Twitter)