ऑफिसमध्ये 'या' 8 गोष्टी कायम ठेवा खासगी, सायकोलॉजीनुसार ठरेल घातक

कामाच्या ठिकाणी 8 गोष्टी ठेवा लपवून   

कायमच आपलं खासगी आयुष्य कामाच्या ठिकाणी लपवून ठेवा. सायकोलॉजीनुसार, आपल्या कामाच्या ठिकाणी काही गोष्टी प्रायव्हेट ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी प्रायव्हेट ठेवणे गरजेचे असते. आपलं आरोग्य,  खासगी नातेसंबंध या गोष्टी टाळाव्यात. यापेक्षा इतर गोष्टींवर चर्चा करुन हे खासगी मुद्दे बाजूला ठेवू शकता. 

1/7

पर्सनल रिलेशनशिप

तुम्ही तुमच्या रोमँटिक लाईफ आणि पर्सनल रिलेशनशिपबद्दल कधीच ऑफिसमध्ये सांगू नका. कालांतराने हा  चर्चेचा विषय बनतो. यामुळे तुमच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये गैरसमज, अस्वस्थता येऊ शकते. 

2/7

हेल्थ इश्यू

कामाच्या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या समस्या सांगितल्या पाहिजेत. पण अनेकदा यामुळे कामात आणि सहकाऱ्यांच्या वागण्यात वेगळेपण दिसू शकते. तसेच आजाराची सगळी माहिती देणे गरजेचे नाही, यामुळे वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले नाहीत. 

3/7

पैशाचे व्यवहार

ऑफिसमध्ये अनेकदा पगार, गुंतवणूक आणि पैशाचे व्यवहार याबाबत कायम गुप्तता पाळणे गरजेचे आहे. यामुळे सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबाबत नकारात्मक विचार येऊ शकतात.   

4/7

राजकीय आणि धार्मिक मत

ही बाब तर अतिशय खासगी आणि संवेदनशील बाब आहे. यामुळे तुमची मत काहीही असतील तरी ती कामाच्या ठिकाणी न सांगणे हाच शहाणपणा आहे. 

5/7

करिअर प्लान

 प्रत्येकाचे त्याच्या आयुष्यात गोल असतात. यामध्ये करिअरचा मोठा वाटा आहे. काहीही असले तरीही ते ऑफिसमध्ये शेअर करु नका. याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. 

6/7

कामाबद्दलच्या समस्या

कामाच्या ठिकाणी कधीच कंपनीबद्दलच्या समस्या शेअर करु नका. जसे की, मॅनेजर किंवा एचआरचं वागणं. कंपनीचे काही नियम, सहकाऱ्यांशी असलेले मतभेद. यामुळे तुमच्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो.   

7/7

सोशल मीडिया ऍक्टिविटी

सहकाऱ्यांसोबत उगाच सोशल मीडियावर जवळीक साधू नका. ओव्हर फ्रेंडली होण्याच्या नादात आपण आपली प्रायव्हसी गमावून बसतो. अनेकदा आपण एकत्र हँगआऊट करतो त्यामुळे एकमेकांना फोटो टॅग करणे अशा ‌ऍक्टिविटी वाढतात.