महाबळेश्वरला जाण्याचा प्लान आखताय? लिंगमळा धबधब्याबाबत प्रशासनाचे महत्त्वाचे आदेश

राज्यात पावसाने जोर धरला आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. साताऱ्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, महाबळेश्वर येथेही मुसळधार पाऊस होत आहे. 

Mansi kshirsagar | Jul 24, 2024, 14:01 PM IST

Lingmala Waterfall Mahabaleshwar: राज्यात पावसाने जोर धरला आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. साताऱ्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, महाबळेश्वर येथेही मुसळधार पाऊस होत आहे. 

1/7

महाबळेश्वरला जाण्याचा प्लान आखताय? लिंगमळा धबधब्याबाबत प्रशासनाचे महत्त्वाचे आदेश

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

 महाबळेश्वर येथे पावसाचा जोर वाढल्याने काही पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे. धोकादायक पर्यटन स्थळाकडे जाणे टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

2/7

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

महाबळेश्वर चा प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा वेण्णा नदी वरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. तसेच धोकादायक ठिकाणी काटेरी तार व काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आले आहे.

3/7

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

महाबळेश्वर मध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील ऑर्थोसीट पॉईंट परिसरातील इतर पॉईंटवर पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे.

4/7

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

मुसळधार पावसामुळे या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

5/7

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

 सध्या लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे डोंगर कपारीतून पडणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फेडत आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सध्या हा धबधबा बंद केला आहे. 

6/7

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

 गेल्या काही दिवसांपासून घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. साताऱ्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

7/7

mahabaleshwar lingmala waterfall temporarily closed for tourists due to heavy rain

 पश्चिम भागात पावसाचा जोर जास्त असल्याने धोकादायक पर्यटन स्थळाकडे जाणे टाळण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.