PHOTO : मुंबईत 70 कोटींचा बंगला, आलिशान कारचे कलेक्शन, 'या' अभिनेत्रीची संपत्ती पतीपेक्षा जास्त; Love Story पण आहे खास

Entertainment : मुंबई जन्मलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून जरी सुरुवात केली पण तिला प्रसिद्ध मिळाली ती दक्षिणेतील चित्रपटातून. आज या अभिनेत्रीची संपत्ती 331 कोटींच्या घरात आहे. 

Oct 18, 2024, 12:05 PM IST
1/7

ही अभिनेत्री तिचा आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योतिका तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून स्वत:ला सिद्ध केलंय. शालेय शिक्षण मुंबईच्या लर्नर्स अकादमी तर मिठीबाई कॉलेजमधून मानसशास्त्राचे शिक्षण घेतलं.  

2/7

ज्योतिकाने अभिनेता सूर्याशी लग्न केलंय. या दोघांची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी आहे. ज्योतिका आणि अभिनेता सूर्याची पहिली भेट पूवेल्लम केतुप्पर चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सूर्याच्या स्वभावाने पहिल्याच नजरेत ज्योतिकाचं मन जिंकलं होतं. पहिल्या भेटीत सूर्या ज्योतिकाशी अगदी कॅज्युअली बोलला. यामुळे ज्योतिकाला खूप आनंद झाला. ज्योतिकाला तिच्या आयुष्याच्या जोडीदाराने तिचा आदर करावा असं वाटत होतं. ज्योतिकाने ते सर्व सूर्यामध्ये पाहिलं होतं.

3/7

ज्योतिकालाही सूर्या आवडू लागली. ज्योतिका आणि सूर्याने सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. इतकंच नाही तर चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान जेव्हा एका दिग्दर्शकाने कपलला रोमँटिक सीन शूट करायला सांगितला तेव्हा दोघेही आपल्या मर्यादेत काम करायचं. एक दिवस अचानक सूर्याने ज्योतिकाला चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केलं.

4/7

ज्योतिका आणि सूर्याचे कुटुंबीयही त्यांच्या नात्याबद्दल आनंदी होते. त्यानंतर काहीही विचार न करता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2006 मध्ये ज्योतिका आणि सूर्याचे तामिळ रितीरिवाजानुसार भव्य लग्न केलं. ज्योतिकानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला आणि पती सूर्यासोबत मुंबईहून चेन्नईला आली. यानंतर ज्योतिका आणि सूर्याला दीया आणि देव अशी दोन मुलं झाली. तिने आता पुन्हा अभिनयाला सुरुवात केलीय.

5/7

कोइमोईच्या अहवालानुसार, ज्योतिका आणि सूर्या यांची एकूण संपत्ती 537 कोटी रुपये आहे. या दोघांनी काही काळापूर्वी मुंबईत 70 कोटींचं घर घेतलंय. ज्योतिकाची एकूण संपत्ती 331 कोटी रुपये आहे. ज्योतिकाची संपत्ती पती सूर्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे एकूण संपत्तीच्या 61.63 टक्के आहे.

6/7

एका चित्रपटासाठी अभिनेत्री जवळपास 5 कोटी रुपये मानधन घेते. सूर्या आणि ज्योतिका त्यांची स्वतःची चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी चालवतात. त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या यादीत BMW 7 Series (1.38 कोटी), Audi Q7 (80 लाख अधिक), Mercedes Benz (61 लाख) आणि Jaguar (1.10 कोटी) यांचा समावेश आहे.

7/7

सूर्याबद्दल बोलायचं झालं तर त्याची एकूण संपत्ती 206 कोटी रुपये आहे. कांगुवा या चित्रपटासाठी त्याने 30 कोटी रुपये घेतले होते.