Jio Offer New Year 2023 : जिओचा भन्नाट प्लॅन, रोज मिळेल 2GB data, किंमत पाहून खुश व्हाल

 Jio ने नवीन वर्षात ग्राहकांसाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देत आहे.

Dec 27, 2022, 15:42 PM IST

Jio New Year Offer : 2023 या नवीन वर्षाची उत्सुकता सर्वांना लागली. अशातच टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने येत्या नवीन वर्षाच्या निमित्ताने शानदार ऑफर्स आणल्या आहेत. Jio ने नवीन वर्षात ग्राहकांसाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा (Unlimited Data) आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देत आहे. हॅपी न्यू इयर 2023 ऑफर अंतर्गत रु. 2023 आणि रु 2,999 चे आणखी दोन रिचार्ज प्लॅन देणार आहेत. चला जाणून घेऊया Jio च्या या प्लॅन्सबद्दल आणि त्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल... 

1/3

जिओचा 749 रुपयांचा प्लॅन

Jio New Year Offer Plan Rs 749 With 90 Days Validity and 180GB data Details and more

जिओच्या 749 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. प्लॅनसोबत 90 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. यासोबतच या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध असतील. म्हणजेच यूजर्सना 90 दिवसांसाठी एकूण 180 GB इंटरनेट डेटा मिळेल. 749 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यामध्ये सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असतील. ग्राहकांना JioCinema, JioTV, JioNews, JioSecurity आणि JioCloud अॅप्स सारख्या अॅप्सच्या Jio सूटचा लाभ देखील मिळेल.

2/3

जिओचा 2023 रुपयांचा प्लॅन

Jio New Year Offer Plan Rs 749 With 90 Days Validity and 180GB data Details and more

Jio ने नवीन वर्षाची ऑफर योजना म्हणून 2023 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 252 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटाची सुविधा आहे. म्हणजेच, तुम्हाला 252 दिवसांसाठी एकूण 630 GB डेटाची सुविधा मिळणार आहे. यासोबतच कंपनी या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे. म्हणजेच, जर तुमची जिओच्या वेलकम ऑफरसाठी निवड झाली.  तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा मिळेल. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील आहे. या प्लॅनसह जिओ फ्री जिओ अॅप सारखे इतर फायदे देखील देते.

3/3

जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन

Jio New Year Offer Plan Rs 749 With 90 Days Validity and 180GB data Details and more

जिओच्या 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा देखील मिळतो. प्लॅनसोबत 388 (356+23) दिवसांची वैधता उपलब्ध आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला संपूर्ण वर्षभर रिचार्जच्या टेन्शनपासून मुक्ती मिळेल आणि 23 दिवस अतिरिक्त मिळतील. Jio च्या 2,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्येही कंपनी हाय स्पीड इंटरनेटसाठी 5G डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे.