Sanjay Rathod : आता 'जमीन घोटाळ्या'मुळे चर्चेत आलेले संजय राठोड आधीही अडकले होते 'या' वादात

Sanjay Rathod : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपच्या महिल्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी टीका देखील केली होती.

Dec 27, 2022, 14:12 PM IST
1/8

Sanjay Rathod yavatmal

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील (shinde fadnavis governmet) मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यापाठोपाठ आता अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हेसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोड यांच्यावरही गायरान जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत.

2/8

sanjay rathod scam

गायरान जमीन खासगी विकासकाला दिल्याचा आरोप विरोधकांनी संजय राठोड यांच्यावर करण्यात आला आहे. फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री असताना 29 जुलै 2019 संजय राठोड यांनी काढलेल्या एका शासकीय आदेशाचा हवाला देत हा सगळा घोटाळा झाला आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.

3/8

minister sanjay rathod

37 कोटींची गायरान जमीन असलेला प्लॉट विकासकाला विकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महसूल राज्यमंत्री असताना राठोड यांनी 29 जुलै 2019 रोजी गायरान जमीन  वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील एका व्यक्तीला देण्याचा आदेश काढला होता. 

4/8

sanjay rathod land scam

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी हा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राठोड यांनी 2018 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द ठरवले. गायरान जमिनीवरुन ती जागा एका महिन्याच्या आत नियमित करण्याच्या सूचना संजय राठोड यांनी दिल्या होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गायरान जमिनीच्या विक्रीचे प्रकरण विरोधकांनी समोर आणलं आहे.

5/8

sanjay rathod pooja chavan

दरम्यान, याआधीही मंत्री संजय राठोड वादग्रस्त ठरले आहेत. पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाले आहे.

6/8

pooja chavan sanjay rathod

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात 7 फेब्रुवारी 2021 रोजी इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली होती. याआधी पूजा चव्हाण आणि मंत्री संजय राठोड यांच्यात फोनवरुन बंजारा भाषेत संभाषण झाल्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या.   

7/8

pooja chavan

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पूजा चव्हाण हीच पूजा राठोड असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. कारण यवतमाळमध्ये गर्भपात झालेली पूजा राठोडनामक तरुणीच पूजा चव्हाण असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्याबाबत कोणताही खुलासा झाला नाही.  

8/8

cm eknath shinde

महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांनी संजय राठोड यांनी क्लिनचिट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यामुळेच त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याचे त्यांनी म्हटले होते.