Jagannath rath yatra : 'या' मंदिरात आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही उमगलं नाही रहस्य

Lord Krishna Heart Secret Reveals : भारतात असे एक रहस्यमय मंदिर आहे जे वैज्ञानिकांसाठी देखील आव्हान ठरत आहे. या मंदिरात आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोकेदेखील थांबतात. परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. द्वापर युगात भगवान श्रीहरी श्रीविष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले, तेव्हा ते त्यांचे मानव रूप होते(The story of Lord Jagannath and Krishna’s heart).वैज्ञानिकांनाही या मंदिराचे रहस्य उमगले नाही. (Jagannath rath yatra 2024)

| Jul 07, 2024, 23:03 PM IST
1/8

डोळ्यावर पट्टी, हातात हातमोजे

भगवान श्रीकृष्णाचे हृदय बदलताना पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातात हातमोजे घातले जातात. चुकून कुणी पाहिले, तर त्याचा मृत्यू होतो, अशी यामागे श्रद्धा आहे. 

2/8

ससा उडी मारल्याचा भास

विधी करण्यापूर्वी पूर्ण दक्षता घेतली जाते. मूर्ती बदलणारे पुजारी सांगतात की, जेव्हा ही प्रक्रिया केली जाते, त्यावेळी ससा उडी मारल्याचा भास होतो.

3/8

श्रीकृष्णाचे हृदय

जेव्हा हा विधी केला जातो, तेव्हा त्या वेळी संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. यानंतर, मूर्ती बदलणारा पुजारी देवाचा चेहरा बदलतो. या मूर्तीखाली आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते, असे म्हटले जाते. 

4/8

कडुलिंबाचं लाकूड

जगन्नाथाची मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनविली जाते आणि दर 12 वर्षांनी भगवान जगन्नाथजींची मूर्ती बदलल्यावर जुन्या मूर्तीतून हा ब्रह्म पदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो.

5/8

चमत्कारिक मंदिर

ओडिशातील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरात भाऊ बलदौ आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत बसलेल्या भगवान कृष्णाशी अनेक रहस्ये जोडलेली आहेत. हे मंदिर अतिशय चमत्कारिक आहे.

6/8

वाऱ्याची दिशा

या मंदिरासमोर आल्यावर वाऱ्याची दिशाही बदलते. असे म्हणतात की वारा आपली दिशा बदलतात, कारण त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आत जाऊ शकत नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत एक पाऊल टाकताच समुद्राचा आवाज थांबतो. मंदिराचा ध्वजही नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.

7/8

ब्रह्मदेवाचे हृदय

अग्नी ब्रह्मदेवाचे हृदय जाळू शकला नाही. हे दृश्य पाहून पांडव स्तब्ध झाले. तेव्हा आकाशातून आवाज आला की हे ब्रह्मदेवाचे हृदय आहे, ते समुद्रात वाहू द्या. यानंतर पांडवांनी भगवान श्रीकृष्णाचे हृदय समुद्रात सोडले.

8/8

भगवान श्रीकृष्णाने देह सोडला अन्

सृष्टीच्या नियमांनुसार, प्रत्येक मानवाप्रमाणे, या स्वरूपाचा मृत्यू निश्चित होता. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाने देह सोडला. जेव्हा पांडवांनी त्यांचे अंतिम संस्कार केले, तेव्हा श्रीकृष्णाचे संपूर्ण शरीर अग्नीत दहन झाला, परंतु त्यांचे हृदय धडधडत होते.   (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)