उन्हाळ्यात काजू-बदाम खावेत की नाही?

उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आरोग्या विभागाकडून काही महत्त्वाचे आवाहन करण्यात येते. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी कोणते पदार्थ-खावेत व कोणते पदार्थ टाळावेत, याबाबतही सांगण्यात येते. 

Mansi kshirsagar | Apr 16, 2024, 18:36 PM IST

उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आरोग्या विभागाकडून काही महत्त्वाचे आवाहन करण्यात येते. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी कोणते पदार्थ-खावेत व कोणते पदार्थ टाळावेत, याबाबतही सांगण्यात येते. 

1/7

उन्हाळ्यात काजू-बदाम खावेत की नाही?

Is it okay to eat almonds and cashew during summers

उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. शरीरात थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 

2/7

शरीरातील उष्णता

Is it okay to eat almonds and cashew during summers

उन्हाळ्यात शरीरातील उष्णतादेखील वाढते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक-कलिंगड, उसाचा रस यासारखे पदार्थ खाल्ले जातात. 

3/7

काजू-बदाम खावेत का?

Is it okay to eat almonds and cashew during summers

उन्हाळ्यात काजू-बदाम खावेत का? याबाबतही अनेक मत-मतांतरे आहेत. याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया. 

4/7

काजू बदाम

Is it okay to eat almonds and cashew during summers

उन्हाळ्यात काजू बदाम खाल्लास उष्ण पडू शकतात, असं काहींचा समज आहे. मात्र योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अपाय होत नाही. 

5/7

बदाम

Is it okay to eat almonds and cashew during summers

 कच्चे बदाम हे शरीरात उष्णता निर्माण करतात. उन्हाळ्यात बदामाचा सेवन केल्यास पित्त दोषाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं कच्चे बदाम खाण्याऐवजी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो.   

6/7

काजू

Is it okay to eat almonds and cashew during summers

काजूचे गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळं जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते हे खरं आहे. पण काजूमध्ये मुबलक प्रमाणात पोषकतत्वे असतात तसंच, गुड फॅटदेखील असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळं रोजच्या दिवसांत 5 ते 6 काजू खाणे योग्य आहे. मात्र अतिप्रमाणात काजू खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते.

7/7

Disclaimer

Is it okay to eat almonds and cashew during summers

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)