'बिश्नोईला संपवून टाकू, अंडरवर्ल्ड संपलं आहे' सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा

Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

राजीव कासले | Apr 16, 2024, 19:01 PM IST
1/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरी जाऊन भेट घेतली. घराबाहेरील गोळीबारानंतर सलमान खानचा पहिला फोटो यानिमित्ताने समोर आलाय. यात सलमानने काळ्या रंगाचं फूल स्लीव टी-शर्ट आणि फिकट रंगाची जिन्स परिधान केली होती. 

2/7

या फोटोमधअये सलमान खानच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतोय. या फोटोंमध्ये सलमान खान खुर्चीवर बसलेला दिसतोय, सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. सलमानच्या सुरक्षेची जबाबादरी महाराष्ट्र सरकारची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

3/7

या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान खानला दिलासा दिला. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहणा-यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला. त्याचबरोबर सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या गँगला महाराष्ट्र पोलीस धडा शिकवेल असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

4/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सलमान खानच्या भेटीचे फोटो एएनआयने शेअर केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे घरी पोहोचताच सलमान खानने त्यांची गळाभेट घेतली. मुंबईत अंडरवर्ल्ड संपलं आहे. बिश्नोईला संपवून टाकू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

5/7

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक करण्यात आलीये.  मुंबई क्राईम ब्रान्चनं ही कारवाई केली. या दोघांना आज मुंबईत आणल.. त्यांना किला कोर्टात हजर केलं असता दोघांनाही 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये

6/7

विशाल ऊर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत. या आरोपींकडून विदेशी पिस्तुलसह जिवंत काडतुसं, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

7/7

पोलिसांच्या दाव्यानुसार हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. ज्याचं बिहार आणि गुजरात कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच हे दोन्ही आरोपी लॉरेन्स गँगचे शूटर्स असल्याचा संशय पोलिसांना आहे..