IPL: या 5 खेळाडूंवर दिल्ली कॅपिटल्सची कमान, कोण करणार टीमचे नेतृत्व?

मुंबई: टीम इंडियाच नाही तर दिल्ली कॅपिटल्ससाठी धक्कादायक बातमी आहे. श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो पुढचे सामने खेळू शकणार नाही. श्रेयस पुन्हा रिकव्हर होऊन कधी मैदानात परतेल याबाबत कोणतीही माहिती सध्या आली नाही. 9 एप्रिलपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रेयस नसताना संघाचं नेतृत्व आणि कमान कोणाच्या खांद्यावर असू शकते जाणून घेऊया.

Mar 25, 2021, 13:08 PM IST
1/5

स्टीव स्मिथ

स्टीव स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. स्मिथने यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि पुण्याचे नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत स्टीव्ह हा दिल्लीच्या कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

2/5

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे देखील कर्णधारपदासाठी दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे. ऑस्ट्रेलियाला राहणेच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने 2-1ने पराभूत केलं होतं. त्यामुळे तोही संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

3/5

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन

भारताचा ज्येष्ठ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे देखील दिल्लीची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. यापूर्वी अश्विननेही पंजाब किंग्जचा कर्णधारपद भूषवले आहे. श्रेयस अय्यर पूर्ण IPLमधून बाहेर राहिला तर अशा परिस्थितीत अश्विनकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4/5

शिखर धवन

शिखर धवन

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी शिखर धवन देखील पर्याय असू शकतात असं सांगितलं जात आहे. शिखरजवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव देखील आहे.

5/5

ऋषभ पंत

ऋषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सची कमान ऋषभ पंतवरही येण्याची शक्यता आहे. असं झालं तर तो सर्वात युवा कर्णधार ठरण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरऐवजी कोणाकडे कर्णधारपदाची जबाबदारी जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.