'चहलने माझा नवरा चोरलाय!' रोहित शर्माच्या बायकोने यजुवेंद्रला म्हटलंय सवत, फोटो झाला व्हायरल

Rohit Chahal Friendship Goals : मैत्रीत सर्वकाही माफ असतं. पण लग्नानंतर बायकोला मैत्रीतील वाटणारी इन्सिक्युरीटी एक मजेशीर क्षण असतो.

Saurabh Talekar | Apr 23, 2024, 16:43 PM IST

Rohit Sharma, Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्या मैत्रीविषयी अनेक किस्से एकायला मिळतात. दोघांची मैत्री म्हणजे 'नंबर 1 यारी'... मात्र, रितिकाच्या कमेंटमुळे दोघांच्या मैत्रीला एक वेगळीच रंगत आलीये.

1/7

पोरापोरांची मैत्री कशी म्हणजे एकदम कट्टर... भांडणं झाली तरी संध्याकाळी एकमेकांच्या गळ्यात हात घालून जाणारी पोरं असतात. अशातच क्रिकेट खेळणाऱ्यांची यादी वेगळीच. टीम इंडियामध्येच अशीच एक जोडी आहे. 

2/7

रोहित शर्मा आणि यजुवेंद्र चहल यांची दोस्ती एवढी भन्नाट की, रोहितची पत्नी रितिका देखील इन्सिक्युर होऊन जाते. एका पोस्टवर कमेंट करताना रितिकाने चहलचा उल्लेख नवरा चोर असा केला होता.

3/7

तुमच्याही पत्नी किंवा गर्लफ्रेंड तुमच्या दोस्तीवर रागावली तर नक्कीच असेल. त्यामुळे तुमची मैत्री किती घट्ट आहे, याचा अंदाज येतो. रोहित अन् चहलचं अगदी तसंच...

4/7

कधी रोहित चहलला पाठीवर मारताना दिसेल तर कधी त्याला घट्ट मिठी मारत आनंद व्यक्त करताना दिसेल. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5/7

तुम्हाला माहिती नसेल तर, युझी रोहितला रोहित म्हणून नाही तर रोहिता म्हणून हाक मारतो. एवढंच नाही तर चहल रोहितला दिवसातून एकदा तरी फोन करतो, अशी अफवा देखील ऐकायला मिळते.

6/7

घरी असताना चहल किती वेळा कॉल करतो? असा सवाल रोहितला विचारला गेला होता. त्यावेळी, तो घरी फोन करत नाही, आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ देतो, असं रोहितने म्हटलं होतं. पण आमची मैत्री तेवढीच घट्ट आहे, असंही त्याने म्हटलं होतं.

7/7

दरम्यान, रोहितच्या बर्थडेला रितिकाने एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी रितिकाने कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. माझा नवरा चोरला आता माझं कॅप्शन देखील चोर, असं म्हणत रितिकाने चहलला डिवचलं होतं.