IPL Auction 2021: 'लाखो दिलो की धडकन' असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

सोशल मीडियावर युझर्सनी या मिस्ट्री गर्लला नॅशनल क्रश जाहीर करावं अशी चर्चा सुरू केली आहे. 

Feb 18, 2021, 22:33 PM IST
1/6

2/6

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावादरम्यान सनराइझर्स हैदराबादकडून बोली लावण्यासाठी ही मिस्ट्री गर्ल समोर आली. त्यावेळी ही नेमकी कोण याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या मिस्ट्री गर्लचं नाव काव्या मारन आहे. जाणून घेऊया काव्या मारनबद्दल

3/6

काव्या प्रसिद्ध व्यवसायिक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. तर माजी केंद्रीय मंत्री दयानिधि मारन यांची भाजी आहे. काव्याचे वडील कलानिधी सन ग्रूपचे मालक आहेत. सनराइझर्स हैदराबाद संघ हा त्यांच्या कंपनीचा संघ आहे. त्याचे सर्व हक्क कलानिधी यांच्याकडे आहेत. 

4/6

स्टाईल है बॉस

स्टाईल है बॉस

आयपीएलसाठी खेळाडूंच्या लिलावदम्यान काव्या मारन पिवळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसली. त्यांची स्टाइल आणि अदा पाहून चाहते आणि क्रिकेटप्रेमी पुरते घायाळ झाले. सोशल मीडियावर युझर्सनी या मिस्ट्री गर्लला नॅशनल क्रश जाहीर करावं अशी चर्चा सुरू केली आहे. 

5/6

SRH

SRH

28 वर्षांची काव्या मारन ही स्वत: सन मुझिकसोबत जोडली गेली आहे. 2018मध्ये ती सर्वात पहिल्यांदा IPLमध्ये दिसली होती. त्यावेळी SRHच्या संघाला चिअर्स करताना टीव्हीवर आल्यानंतर मात्र तिची चर्चा होऊ लागली. त्यानंतर प्रत्येक लिलावावेळी काव्या तिथे स्वत: उपस्थित असते.  

6/6

मिस्ट्री गर्लचं शिक्षण

मिस्ट्री गर्लचं शिक्षण

मिस्ट्री गर्ल आणि सौंदर्यवती काव्या मारनने MBAमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. MBA करण्यामागे वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावण्यासाठी केल्याची चर्चा आहे.