28 लाखांची संपत्ती, 27 हजारांच्या लीडने विजय... महाराष्ट्राला मिळाला सर्वात तरुण आमदार; वय अवघं...

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार विधानसभेत निवडून आला आहे. हा आमदार आहे तरी कोण, तो कुठून निवडून आला आहे आणि त्याची संपत्ती किती आहे पाहूयात... 

| Nov 23, 2024, 18:38 PM IST
1/17

rohitpatil

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार यंदाच्या विधानसभेमध्ये निवडून आला आहे. जाणून घ्या या आमदाराबद्दल...

2/17

rohitpatil

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार या निवडणुकीमधून मिळाला आहे. याच आमदाराबद्दल जाणून घेऊयात.

3/17

rohitpatil

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये विजेत्या ठरलेल्या आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार हा अवघ्या 25 वर्षांचा आहे.  

4/17

rohitpatil

विशेष म्हणजे अवघ्या 10 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा आमदार आहे.

5/17

rohitpatil

या आमदाराचं नाव आहे, रोहित आर पाटील! 

6/17

rohitpatil

रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांचे सुपुत्र आहेत.   

7/17

rohitpatil

रोहित पाटलांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

8/17

rohitpatil

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांनी सुमनताई पाटील यांच्यासहीत संपूर्ण कुटुंबाने शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.   

9/17

rohitpatil

रोहित पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडून तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.  

10/17

rohitpatil

तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान होते.   

11/17

rohitpatil

संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. रोहित पवारांनी त्यांचा 27 हजार 644 मतांनी पराभव केला.  

12/17

rohitpatil

तासगाव मतदारसंघात 1990 पासून पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे.   

13/17

rohitpatil

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमनताई पाटील 2014 च्या पोटनिवडणुकीत आणि 2019 च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या.  

14/17

rohitpatil

सुमनताई पाटील यांच्यानंतर आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार रोहित पाटील जिंकले असून ते 15 व्या विधानसभेच्या सभागृहातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत.  

15/17

rohitpatil

रोहित पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केल्याप्रमाणे, त्यांच्याकडे 36 हजारांची रोख रक्कम आहे.   

16/17

rohitpatil

रोहित पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे एक लाख 60 हजार रुपयांचे दागिने आहेत.   

17/17

rohitpatil

रोहित पाटील यांच्याकडे 28 लाख 42 हजार रुपये चल मालमत्ता आणि 86 लाख 80 हजार रुपयांची अचल मालमत्ता आहे.