शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उजळून निघाला रायगड किल्ला

Feb 18, 2021, 20:40 PM IST
1/7

छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगड पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजाळून निघाला. 

2/7

अनेक दिवस अंधारात असणार्‍या वास्तू प्रकाशमान झाल्या. राजसदरसह रायगडवरील विविध वास्तूंना रंगीबेरंगी रोषणाईने वेगळी झळाळी मिळाली.

3/7

रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. ज्याला पुरातत्त्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. 

4/7

बुधवारी रायगडवर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रायगड प्रकाशमान झाला. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे वचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

5/7

छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर, होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांनी केला आहे. 

6/7

 समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प उद्या शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होणार आहे.

7/7

किल्ले रायगड विद्युत रोषणाईने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.