आयपीएलमधल्या खराब फॉर्ममुळे 'हा' खेळाडू अडचणीत, टी20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळणार?

T20 World Cup : आयपीएल 2024 नंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. याच कामिगिरीच्या जोरावर टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. 

Apr 11, 2024, 14:11 PM IST
1/7

आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर बीसीसीआय निवड समिती टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 4 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.   

2/7

आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर बारीक लक्ष ठेऊन आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. अभिषेक शर्मा, मयंक यादव, शशांक सिंह, रियान पराग या खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. तर टी20 वर्ल्ड कपसाठी दावेदार मानले जाणारे काही खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉप ठरतायत.

3/7

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत फारशी चमकदार कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिलं नाव आहे ते यशस्वी जयस्वालचं. टीम इंडियाचा हा सलामीचा फलंदाज आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. टी20 वर्ल्ड कपसाठी यशस्वी प्रमुख दावेदार आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. 

4/7

यशस्वी जस्वाल राजस्थान रॉयल्समधून खेळतो. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपेकी तब्बल चार सामने जिंकले आहेत. पण राजस्थानच्या या विजयात यशस्वी जयस्वालचा वाटा फारसा मोठा वाटा नाही. पाच सामन्यात जयस्वालने 24, 5, 10, 0 आणि 24 धावा केल्यात.  

5/7

यशस्वी जयस्वालने पाच सामन्यात अवघ्या 63 धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमधली त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे 24. यशस्वी जयस्वालला टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात जागा मिळवायची असेल तर उर्वरीत सामन्यात त्याला आपला दावा सिद्ध करावा लागणार आहे. 

6/7

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच घोषणा केली आहे. आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या  कर्णधारपदी रोहित शर्मा असणार आहे. तसंच टीम इंडियाच्या डावाची सुरुवातही रोहितच करणार. आता प्रश्न आहे तो रोहित बरोबर सलामीला कोण येणार. यशस्वी जयस्वालला सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे युवा स्टार शुभमन गिलचं.

7/7

शुभमन गिल यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सची धुरा सांभाळतोय. कर्णधारपद सांभाळण्याबरोबरच गिलने सहा सामन्यात तब्बल 255 धावा केल्या आहेत. आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतात तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाबाद 89 ही त्याची यंदाच्या आयपीएलमधली सर्वोत्तम धावसंख्या आहे.