गोविंदाचे 5 ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही कोणी मोडू शकले नाही रेकॉर्ड

गोविंदा आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आपण त्याच्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. 

| Dec 21, 2024, 12:57 PM IST
1/7

61 वा वाढदिवस

90च्या दशकापासून हिंदी चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा गोविंदा आज 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 21 डिसेंबर 1963 मध्ये विरारमध्ये झाला होता. 

2/7

इल्जाम

गोविंदाने त्याच्या करिअरची सुरुवात 1986 मध्ये 'इल्जाम' या चित्रपटातून केली होती. त्यानंतर अभिनेत्याने अनेक चित्रपट केले. इंडस्ट्रीमध्ये त्याला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने आतापर्यंत 170 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. 

3/7

कुली नंबर 1

सर्वात प्रथम गोविंदाच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात. हा चित्रपट 1995 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा 6 वा चित्रपट होता. हा कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी बघायला मिळाली होती.

4/7

साजन चले ससुराल

'साजन चले ससुराल' हा कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट आहे. ज्यामध्ये गोविंदासोबत करिश्मा कपूर आणि तब्बू दिसले होते. या चित्रपटाचे बजेट 4.25 कोटी होते. या चित्रपटाने 13.82 कोटींची कमाई केली होती. 

5/7

दीवाना मस्ताना

गोविंदा, अनिल कपूर आणि जूही चावला यांचा 'दीवाना मस्ताना' हा चित्रपट देखील खूप कॉमेडी आहे. या चित्रपटाचे बजेट 6 कोटी रुपये इतके होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 24 कोटींची कमाई केली होती.   

6/7

दूल्हे राजा

1998 मध्ये रवीना टंडन आणि गोविंदाचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दूल्हे राजा' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट 5 कोटी होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 21.45 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

7/7

हसीना मान जाएगी

गोविंदा, संजय दत्त, करिश्मा कपूर आणि पूजा बत्रा यांचा 'हसीना मान जाएगी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटातील संजय दत्त आणि गोविंदाची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती.