IPL 2021 : RR ची जर्सी अजून ठरेना! काय आहे कारण, पाहा संघ आणि जर्सीचे फोटो

9 एप्रिलपासून 6 शहारांमधील मैदानात IPL 2021 चौदाव्या हंगामाचा धुरळा उडणार आहे. त्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. IPLनं ऍन्थम देखील लाँच केलं आहे. तर दुसरीकडे 7 संघांनी त्यांच्या जर्सी लाँच केल्या आहेत. फक्त एका संघानं मात्र आपली नवी जर्सी लाँच केली नाही. या मागचं काय कारण आहे जाणून घ्या  

Mar 25, 2021, 11:38 AM IST
1/8

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्सची जर्सी यंदा खास चर्चेचा विषय आहे. याचं कारण महेंद्रसिंग धोनीनं खास स्वत:साठी विशेष जर्सी करून घेतली आहे. धोनीच्या जर्सीवर  कॅमॉफ्लॉज लावण्यात आलं आहे.  खेळाडू- सुरेश रैना, एमएस धोनी, नारायण जगदीसन, ऋतुराज गायकवाड, केएम आसिफ, जोश हेजलवुड, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, दीपक चहर, फाफ डु प्लेसिस, शार्दुल ठाकूर, मिशेल सॅटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगीडी, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, इम्रान ताहिर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, के गोथम, चेतेश्वर पुजारा, एम. हरिशंकर रेड्डी, के.भागाथ वर्मा, सी हरी निशांत, आर साई किशोर

2/8

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सला यंदा सॅमसंग आणि DHL टायटल स्पॉन्सर्स आहेत.  खेळाडू- रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बाउल्ट, अ‍ॅडम मिल्ले, नॅथन कोल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशान, युधवीर चरक, मार्को जानसेन, अर्जुन तेंडुलकर  

3/8

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सने यंदा आपली जर्सी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये आणली आहे. JSW, EbixCash, Jio and Apollo यांच्याकडून त्यांना स्पॉन्सर्स आहेत.  खेळाडू- श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमीयर, ख्रिस वॉक्स, ऍरिच नॉर्टजे, स्टीव्ह स्मिथ , उमेश यादव, रिपाल पटेल, लुकमान हुसेन मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग्ज, प्रवीण दुबे, विष्णू विनोद

4/8

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्स

MPL टायटल स्पॉन्सर्स असलेली त्यांची ही जर्सी आहे. त्यांनी 2020 ची जर्सी यावर्षी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विशेष बदल करण्यात आले नाहीत.  खेळाडू- दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नगरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्धि कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारिन, इयन मॉर्गन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, पवन नेगी , टिम सेफर्ट, साकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर

5/8

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं आपल्या जर्सीमध्ये विशेष बदल केला नाही.  खेळाडू- विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिकक्कल, हर्षल पटेल, डॅनियल सॅम, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झंपा, शाहबाज अहमद, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमीसन, डॅन ख्रिश्चन, सुयेश प्रभुदेसाई, के.एस. भरत, फिन एलन

6/8

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबाद

JK Lakshmi Cement यांचं स्पॉन्सर्स मिळाले आहेत. याशिवाय जिओ, कोलगेटसारखे अनेक ब्रॅण्ड्स त्यांच्यासोबत असणार आहेत.  खेळाडू- केन विलियमसन, डेविड वार्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान , जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बासिल थम्पी, जेसन होल्डर, जगदीश सुचित, केदार यादव, मुजीब उर रहमान 

7/8

पंजाब किंग्स

पंजाब किंग्स

लाल रंगाची ही त्यांची जर्सी आहे. त्यांनी या वर्षी आपला नवीन लोगो या जर्सीवर आणला आहे.  खेळाडू- केएल राहुल , ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, निकोलस पूरन, मंदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभिसिमन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल , डेव्हिड मालन, झे रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरीडिथ, मोइसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन अलन, सौरभ कुमार

8/8

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सला अद्याप कोणी स्पॉन्सर मिळाला नाही. त्यामुळे त्यांची जर्सी अजून लाँच करण्यात आली नाही. लवकरच ही जर्सी लाँच करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.  संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रयू टाई, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहण, मनन वोहण , क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहीम, चेतन सकारिया, के.सी. करियप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह