iPhone 15 च्या किंमतीत होऊ शकता नव्याकोऱ्या SUV चे मालक; समजून घ्या नेमकं गणित

iPhone 15 Price Interesting Facts: अ‍ॅपल आयफोन 15 घेण्याचा तुम्ही विचार करत आहात का? बरं मग अ‍ॅपल आयफोन 15 च्या किंमतीमध्ये एक एसयुव्ही तुम्ही विकत घेऊ शकतो असं सांगितलं तर? आता तुम्हाला हे वाचून नक्कीच यात काहीतरी गोंधळ दिसतोय असं वाटू शकतं. मात्र तसं काहीही नाही. खरोखरच आज ज्या किंमतीला आयफोन मिळतोय त्याच किंमतीत एक नव्याकोऱ्या एसयूव्हीचे तुम्ही मालक होऊ शकता. कसं ते पाहूयात...

| Sep 19, 2023, 11:54 AM IST
1/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

अ‍ॅपल आयफोनच्या फिचर्सबरोबर चर्चा असते ती या जगातील सर्वात अत्याधुनिक स्मार्टफोनच्या किंमतीची. अनेकदा आयफोन फार महाग असल्याने परवडत नाहीत असं टेक्नोप्रेमी तक्रारीच्या स्वरात सांगताना दिसतात. मात्र सालाबादप्रमाणे यंदाच्या सिरीजमधील म्हणजेच आयफोन 15 सिरीजमधील फोन महाग असले तरी त्यांना मोठी मागणी आहे.

2/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

पहिल्या 3 दिवसांमध्येच आयफोन 15 च्या प्री-बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे. भारतामध्ये मागील वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन 14 च्या तुलनेत आयफोन 15 च्या बुकिंगमध्ये 25 टक्के वाढ दिसून येत आहे.

3/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

बरं आयफोन 15 ची किंमत कमी आहे असंही नाही. बेस मॉडेल आणि प्रिमियम प्रो मॅक्स मॉडेलची किंमत 1 लाख 59 हजार 990 रुपये ते 1 लाख 99 हजार 900 दरम्यान आहे.

4/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

अ‍ॅपलच्या आयफोनची क्रेझ लक्षात घेता आयफोन 15 चे 3 लाख युनिट्स लॉन्चिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र हे सर्व फोन बुक झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता हेच पैसे आयफोन प्रेमींनी योग्य पद्धतीने गुंतवले असते तर किती पैसे झाले असते तुम्हाला ठाऊक आहे का?

5/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

आयफोन 15 जितक्या किंमतीला येतो तितके पैसे आज म्युचुअल फंडात लावल्यास आयफोन 15 जुना होईपर्यंत गुंतवणुकदाराची घसघशीत कमाई होईल. खरं तर आयफोनसारख्या गोष्टीत केलेली गुंतवणूक ही दिर्घकालीन नसते. अनेकजण तर दर वर्षाला किंवा 2 वर्षांमध्ये फोन बदलतात. 

6/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

एका अहवालानुसार आयफोनची सरासरी लाइफ ही 5 वर्षांची असते. त्यामुळेच जर आयफोन 15 ची सध्याची किंमत जितकी आहे तितका पैसा 5 वर्षांसाठी म्यूचुअल फंडामध्ये गुंतवल्यास किती फायदा होईल? असा प्रश्न पडला असेल तर या पैशांवर मिळणारा परतावा पाहून तुम्ही थक्क व्हाल. 5 वर्षात हे पैसे तिपटीने वाढतील. या पैशांमध्ये चक्क एक SUV विकत घेता येईल.

7/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

5 वर्षांमधील सर्वाधिक परतावा देणाऱ्या म्यूचुअल फंडांबद्दल बोलायचं झाल्यास Mirae Asset Tax Saver Fund Direct-Growth ने तब्बल 25.48 टक्के परतावा दिला आहे. या फंडाचा वार्षिक परतावा सरासरी 18.39 टक्के इतका आहे. 

8/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

या फंडामध्ये आयफोन 15 प्रो मॅक्सच्या किंमतीएवढे म्हणजेच 1 लाख 99 हजार 900 रुपये गुंतवल्यास हे पैसे 3 वर्षांमध्येच दुप्पट होतील. तर 5 वर्षांचा विचार केल्यास व्याज म्हणून 4 लाख 21 हजार 950 रुपये परत मिळतील. म्हणजे 1 लाख 99 हजार 900 रुपये गुंतवल्यास 6 लाख 21 हजार 850 रुपये 5 वर्षानंतर मिळतील.

9/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

टाटाच्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीबद्दल बोलायचं झाल्यास टाटाच्या पंच या कारची दिल्लीतील एक्स शो रुम किंमत 5.99 लाख रुपये इतकी आहे. आयफोन 15 च्या पैशांची वर नमुद केल्याप्रमाणे योग्य फंडात गुंतवणूक केल्यास 6.22 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो.

10/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

यावरुनच आयफोनच्या पैशामध्ये चक्क एका एसयुव्हीचं मालक होणं शक्य असल्याचं दिसून येतं. यासाठी केवळ योग्य संयम आवश्यक आहे.

11/11

iPhone 15 price vs mutual fund Investment

Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.