Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!

आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.

| Jun 21, 2024, 16:37 PM IST

Investment Tips: आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.

1/10

Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांनी 'अशी' करा गुंतवणूक, काही वर्षात व्हाल करोडपती!

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

Investment Tips: आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही. तुम्हाला दरमहा 25 हजार ते 30 हजार पगार असेल तरी तुम्ही करोडपती बनू शकता.

2/10

करोडपती होणे इतके अवघड नाही

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

30 हजार पगार असलेल्या व्यक्तीला भविष्यात तू करोडपती बनणार आहेस असं कोणी येऊन सांगितलं तर तो विश्वास नाही ठेवणार. पण तुमच्या आर्थिक नियोजनावर सर्वकाही अवलंबून आहे. ते तुम्ही योग्य दिशेने केले तर आजच्या काळात करोडपती होणे इतके अवघड नाही.

3/10

करोडपती कसे बनता येईल?

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

आजच्या काळात, गुंतवणुकीची अशी अनेक साधने आहेत ज्याद्वारे कमी पगार असलेले लोकही त्यांचे करोडपती बनण्याचे स्वप्न साकार करू शकतात. म्युच्युअल फंड एसआयपी यापैकी एक आहे. SIP मुळे 30,000 रुपये महिना कमावणाऱ्या व्यक्तीलाही करोडपती कसे बनवता येईल याबद्दल जाणून घेऊया. 

4/10

जोखीम कमी

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

म्युच्युअल फंड एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे. त्यामुळे त्यामध्ये परताव्याची हमी नाही. असे असले तरी स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा यातील जोखीम कमी असल्याचे म्हटले जाते.  

5/10

चक्रवाढीमुळे पैसा दीर्घकाळात वाढतो

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला 12 टक्के इतका सरासरी परतावा मिळू शकतो. जो इतर कोणत्याही योजनेपेक्षा खूप जास्त आहे. काहीवेळा यापेक्षा चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. चक्रवाढीमुळे, म्युच्युअल फंडातील पैसा दीर्घकाळात वेगाने वाढतो. 

6/10

एसआयपी करण्याचा सल्ला

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

त्यामुळे एसआयपीतील गुंतवणूक लोकांना खूप फायदेशीर वाटते.  बहुतेक आर्थिक सल्लागार पोर्टफोलिओमध्ये एसआयपी करण्याचा सल्ला देतात. 

7/10

50-30-20 फॉर्मुला

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

असे असताना मला 30 हजार रुपये पगार आहे. मी करोडपती कसा होईन? हाच तुमचा प्रश्न असेल तर यासाठी 50-30-20 फॉर्मुला वापरावा लागेल. तुमच्या उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी लागेल. 

8/10

दर महिन्याला 6,000 रुपये

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

30,000 च्या 20 टक्के रक्कम 6,000 रुपये इतकी होते. तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला 6,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही 24 वर्षात करोडपती व्हाल.

9/10

83 लाख 8 हजार 123 रुपये व्याज

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

अशा परिस्थितीत तुम्ही 24 वर्षांत एकूण 17 लाख 28 हजार रुपये गुंतवाल. 12 टक्के दराने यावर 83 लाख 8 हजार 123 रुपये व्याज मिळेल.

10/10

24 वर्षांच्या आत करोडपती

Investment Tips 30 thousand Salaried Employee becom Crorepati with Mutual Funds SIP Benefits

अशा प्रकारे 24 वर्षांत तुम्ही 1 कोटी36 हजार 123 रुपयांचे मालक व्हाल. कालांतराने तुमचे उत्पन्न देखील वाढेल. त्यानुसार तुम्ही त्यात तुमची गुंतवणूक वाढवू शकता आणि 24 वर्षांच्या आत करोडपती होऊ शकता.