INDIA 'A' vs England Lions: BCCI ने अभिमन्यु ईश्वरनच्या खांद्यावर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

 INDIA 'A vs England Lions : बंगालचा क्रिकेटपटू अभिमन्यू ईश्वरन याला INDIA 'A'  संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान आणि प्रदोष पॉल यांसारखे काही खेळाडू टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करतील.  

Jan 07, 2024, 16:01 PM IST

 

 

1/7

INDIA 'A vs England Lions :  टीम इंग्लंड या महिन्यात कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. याआधी INDIA 'A' आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सराव सामने आणि अनधिकृत कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे.  

2/7

भारतीय डॉमेस्टिक खेळाडू अभिमन्यू ईश्वरन हा टीम इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मॅचचं नेतृत्व करणार आहे.  टीम इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. ही मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आह. 

3/7

बंगालचा अनुभवी खेळाडू अभिमन्यू ईश्वरनची टीम इंडियाची मोठी जवाबदारी सोपवली आहे. 12-13 जानेवारी रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत दौऱ्यावर इंग्लंड लायन्स संघ या सामन्यापूर्वी दोन दिवसीय सराव सामनाही खेळणार आहे.

4/7

त्यानंतर 17 ते 20 जानेवारी दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार दिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय संघात साई सुदर्शन, रजत पाटीदार, केएस भरत आणि नवदीप सैनी यांचाही समावेश आहे.  

5/7

INDIA 'A' संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतत आहे. ज्यामध्ये संघाने दोन अनधिकृत कसोटी सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेसाठी केएस भरतला कर्णधार बनवण्यात आले होते आणि ईश्वरन देखील संघाचा एक भाग होता.   

6/7

ईश्वरन फक्त एका सामना खेळला, ज्यात त्याने 18 धावा केल्या, तर एस भरत फक्त सहा धावा करून बाद झाला.  

7/7

प्रदोष रंजन पॉल हा इंग्लंड लायन्स टीम सेबत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत तो त्याच्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक असेल. पहिल्या अनधिकृत कसोटीत त्याने 163 धावांची इनिंग खेळली होती.