व्हायरल इन्फेक्शन झालं? गांभीर्याने घ्या ही लक्षणे, वाचा व्हायसरवरील उपाय...

Viral Infection In Maharashtra : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढली आहे. कारण, एका विचित्र साथीच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांना बरेच दिवस सर्दी, खोकला आणि ताप असल्याचं दिसून येत आहे. 

Jan 07, 2024, 15:42 PM IST

Viral Infection : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. परिणामी या विचित्र 'व्हायरल इन्फेक्शन'ला सामोरे जावे लागत आहे. आठवडाभराहून अधिक दिवस ताप राहणे, खोकलाही 15 दिवसांत कमी न होण्यासारख्या समस्या बहुसंख्य कुटुंबांतील किमान एका व्यक्तीला तरी सतावत असल्याने ही विचित्र साथ शहरवासीयांसाठी तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे. जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन पासून दूर राहायचं असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करु शकतात. 

1/7

व्हायरल दरम्यान हलक्या प्रमाणात उकळलेल्या विना मसाला टाकलेल्या भाज्यादेखील फायदेशिर असतात. काळी मिरची आणि थोडेसे मिठ उकळलेल्या भाज्यांमध्ये टाकून खाल्यास शरीराचे तापमान सामान्य राहते आणि प्रतिकारशक्तीदेखील वाढते.    

2/7

तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. अस्थमा, आर्थराइटिसचा त्रास दूर करण्यासाठी मदत होते. सर्दी-खोकल्यावरही तुळस गुणकारी आहे. काळी मिरीमध्ये असणारे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-बायोटिक गुण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.   

3/7

थंडीच्या दिवसांत आवळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असतं. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह पचनक्रियाही सुधारण्यास मदत करतं. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठीही याचा फायदा होतो.

4/7

आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लमेटरी गुण असतात. जे ताप आणि सर्दीपासून बचाव होण्यासाठी फायदेशीर ठरतात. सोबतच घशात होणारी खवखव, श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासापासूनही बचाव होऊ शकतो. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी हा उत्तम उपाय ठरु शकतो.  

5/7

एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर हळद मिसळून रोज सकाळी पिणं फायद्याचं ठरु शकतं. लिव्हरसाठी हे पाणी गुणकारी आहे. लिव्हरमधील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. हळदमध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असल्याने ते व्हायरल इन्फेक्शनवर लढण्यासाठी सक्षम बनवतात.  

6/7

लसूनमध्ये असणारे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण अनेक आजारांपासून सुरक्षा कवच प्रदान करतात. जे लोक दररोज लसनाचं सेवन करतात त्यांना व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. रोज सकाळी 2 पाकळ्या लसून खाणं फायदेशीर ठरु शकतं.  

7/7

जेव्हा आपण कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून प्रभावित असाल तर सर्वात अगोदर त्याचा समुळ नाश कसा होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि यावर सवोत्कृष्ठ पर्याय म्हणजे पाणी. कोणत्याही व्हायलरला लांब ठेवण्यासाठी पाणी हा सर्वांपेक्षा चांगला पर्याय आहे. पाण्याचा अधिक सेवनाने आपण शरीरातील टॉक्सिनला बाहेर काढु शकतात.