Instagram वर लपूनछपून कोण पाहतंय तुमचं प्रोफाईल? 'अशी' पाहता येतील सगळी नावं

Instagram Tips & Tricks: कोणत्या सेटिंगमुळं आणि नेमकं कुठं पाहता येतील ही नावं? प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं...? सर्वकाही कळणार...   

Dec 05, 2024, 09:41 AM IST

Instagram Tips & Tricks: साधारण दशकभराच्या काळापासून इन्स्टाग्रामची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली आणि पाहता पाहता फेसबुकला मागे टाकत हे अनेकांच्याच आवडीचं माध्यम ठरलं. 

1/7

इन्स्टाग्राम

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

Instagram Tips & Tricks: तरुणाईमध्येच नव्हे, तर सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये सध्या इन्स्टाग्रामची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.   

2/7

रील्स

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

रील्स असो किंवा एखादा फोटो, रेसिपी, भटकंतीची ठिकाणं, खाण्यापिण्याच्या जागा, विनोदी मीम्स या आणि अशा बहुविध कंटेंटसाठी मागील काही वर्षांमध्ये इन्स्टाग्रामचा सर्रास वापर होताना दिसला. पण, याच माध्यमातून काही गैरप्रकारही समोर आले.   

3/7

प्रोफाईल

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

अनेक Settings असतानासुद्धा प्रोफाईल हॅक होणं, अनोळखी व्यक्तींकडून ते पाहिलं जाणं ही प्रकरणं समरो येऊ लागली आणि या सर्व हालचालींमुळं गोपनियतेचं उल्लंघन होण्याचा मुद्दा डोकं वर काढताना दिसला. पण, यावरही एक सुवर्णमध्ये निघाला. जिथं, तुमच्या प्रोफाईलवर नेमकं कोणकोण भेट देतंय हे लक्षात येऊ शकतं.   

4/7

सेटिंग्ज

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

इन्स्टाग्रामवर काही अशा सेटिंग्ज आहेत ज्या माध्यमातून तुमचं प्रोफाईल कोण पाहत आहे याचा सहज अंदाज तुम्हाला येऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम इन्स्टा अकाऊंट सुरू करून त्यात प्रोफाईलमध्ये जा. यानंतर वरच्या बाजूला उजवीकडे दिसणाऱ्या तीन रेषांवर क्लिक करा आणि तिथं Blocked सेक्शनमध्ये जा.   

5/7

You May Want to Block

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

इथं तुम्हाला You May Want to Block हा पर्याय दिसेल, जिथं तुम्हाला अनेक प्रोफाईल आणि युजर्सची नावं दिसतील. यापैकी कोणतंही प्रोफाईल तुम्हाला त्रासदायक किंवा अडचणीचं वाटत असल्यास तुम्ही ते सहजपणे ब्लॉक करू शकता. अनेकदा इथं कोणतंही नाव दिसत नाही.   

6/7

नवे फिचर

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

इन्स्टाग्राम सातत्यानं युजर्सच्या गोपनियतेला केंद्रस्थानी ठेवत काही नवे फिचर वापरात आणत असतं. याच फिचर्सच्या मदतीनं एखादी अनोळखी व्यक्ती तुमचं प्रोफाईल पाहत आहे का, त्याचे नेमके मनसुबे काय यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता.   

7/7

प्रायव्हेट अकाऊंट

Instagram Tips and Tricks How to find Who Stalks

तुमचं अकाऊंट कोणीही पाहू नये असं तुम्हाला वाटत असल्यात तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन अकाऊंट प्रायव्हेट करू शकता. समोरून कोणी तुम्हाला फॉलो रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर तुमचं प्रोफाईल त्या व्यक्तीला पाहता येणार नाही.