R Praggnanandhaa : कार्टुनचा नाद सोडवण्यासाठी बुद्धीबळ शिकला, प्रज्ञानंदचा प्रेरणादायी प्रवास

R Praggnanandhaa : वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेच्या (FIDE Chess World Championshup) अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या प्रज्ञानंदला पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्सन कार्लसनने आर प्रज्ञानंदचा  (Magnus Carlsen) टायब्रेकर सामन्यात पराभव केला. पहिला टायब्रेकर सामना कार्लसनने जिंकला, दुसरा सामना प्रज्ञानंदला जिंकायचा होता, पण दुसरा सामना अनिर्णित राहिल आणि कार्लसन पुन्हा एका विश्वकप विजेता ठरला.

राजीव कासले | Aug 24, 2023, 17:40 PM IST
1/8

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे.  भारताच्या आर. प्रज्ञानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 

2/8

पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकायचाच होता, पण तो अनिर्णित राहिला. त्यामुळे कार्लसन नवा विश्वकप विजेता ठरला.

3/8

पण पराभव पत्करावा लागला असला तरी प्रज्ञाननंदने अगदी लहान वयातच डोंगराएवढी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या 18 वर्षी प्रज्ञाननंदने बुद्धीबळ खेळात संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भागल पाडलं आहे. 

4/8

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी प्रज्ञाननंदला बुद्धीबळ खेळाची आवड निर्माण झाली. प्रज्ञाननंदची बहिण वैशाली ही देखील कमी वाय ग्रँड मास्टर बनली होती. 

5/8

इतर लहान मुलांप्रमाणेच प्रज्ञाननंदलाही कार्टुन पाहण्याची आवड होती. पण त्याच्या कार्टुनचा नाद सोडवण्यासाठी बहिण वैशालीने प्रज्ञानंदला बुद्धीबळ खेळाचे धडे दिले

6/8

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी प्रज्ञाननंदने अंडर-7 इंडियन चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं. त्यानंतर एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकावलं. हा प्रवास इथेच थांबला नाही

7/8

अंडर-8 आणि अंडर-10 वर्ल्ड युथ चेस स्पर्धेतही प्रज्ञाननंदने खिताब जिंकला. 2016 मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी प्रज्ञाननंदने आंतरराष्ट्रीय चेस फेस्टिव्हलमध्ये इतिहास रचला.

8/8

10 वर्ध, 10 महिने आणि 19 दिवसांच्या वयात प्रज्ञाननंद आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे. 2018 मध्ये त्याच्या नावावर ग्रँडमास्टर खिताब लागला.