1 रुपयाहून कमी किंमतीत मिळतो लाखोंचा विमा! काय असते ट्रेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स?

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते. 

Pravin Dabholkar | Jun 17, 2024, 15:20 PM IST

Train Travel Insurance:भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते. 

1/10

1 रुपयाहून कमी किंमतीत मिळतो लाखोंचा विमा! काय असते ट्रेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स?

Train Travel Insurance:रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. या घटना लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते. 

2/10

रेल्वे प्रवास विमा म्हणजे काय?

ऑनलाईन तिकीट बुक करताना रेल्वे विम्याचा पर्याय आहे. विमा पर्याय निवडल्यानंतर, प्रवाशाच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर एक मेसेज पाठविला जातो. या मेसेजमध्ये विमा कंपनीचे नाव आणि प्रमाणपत्र क्रमांक असतो. जो दाव्याच्या वेळी खूप उपयुक्त आहे. याशिवाय विमा कंपनीचा एक हेल्पलाइन क्रमांक देखील असतो. जेथे तुम्ही याबद्दल चौकशी करु शकता.

3/10

विमा कधी घ्यायचा ?

आता विमा कधी घ्यायचा हा प्रश्न पडतो, जेव्हा जेव्हा रेल्वे रुळावरून घसरणे, दुसऱ्या ट्रेनला धडकणे अशा प्रकारचे रेल्वे अपघात होतात. तेव्हा अपघातग्रस्त झालेल्या प्रवाशांना अशा अपघातात रेल्वे प्रवास विम्याचा लाभ मिळतो. 

4/10

आत्महत्या केल्यास विमा नाही

रेल्वे प्रवासादरम्यान एखादा प्रवासी आत्महत्या करत असेल इतर कोणत्याही अपघाताचा बळी ठरला तर भारतीय रेल्वे विमा देत नाही.

5/10

ऑनलाइन तिकीट बुकिंगवर

रेल्वे विम्याचा लाभ फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, जनरल अशा सर्व कॅटेगरीतील तिकीटांवर मिळतो. मात्र प्रवाशाने काउंटरवरून तिकीट घेतले असेल तर त्याला विम्याचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ विमा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगवर उपलब्ध आहे. मुलांसाठी अर्ध्या किंमतीच्या घेतलेल्या तिकिटांवर विमा उपलब्ध नाही.

6/10

कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच

ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच मिळतो. याचा अर्थ वेटिंग तिकीट असणाऱ्यांना या विम्याचा लाभ मिळत नाही.

7/10

क्लेम मिळवण्याची पद्धत

रेल्वे अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत विम्यासाठी दावा करता येतो. जखमी व्यक्ती, नॉमिनी किंवा त्यांचा वारस विम्यासाठी क्लेम करु शकतो. यासाठी वरीलपैकी एखाद्याला विमा कंपनीकडे अर्ज करावा लागतो. संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात.

8/10

10 लाख रुपयांपर्यंतचा दावा

जर एखाद्या प्रवाशाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे अपंग झाला तर त्याला 10 लाख रुपयांपर्यंतचा दावा मिळू शकतो. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या प्रवाशाला 7.5 लाख रुपये आणि जखमी प्रवाशाला उपचारासाठी 2 लाख रुपयांचा क्लेम मिळतो.

9/10

क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे

रेल्वे प्राधिकरणाने जारी केलेला अपघाताला दुजोरा देणारा अहवाल  असावा. अॅक्सिडंट क्लेम फॉर्मवर नॉमिनी आणि कायदेशीर वारसाची सही असावी. अपंग प्रवाशाने अपघातापूर्वीचे आणि नंतरचे फोटो जोडावे.  तसेच संबंधित प्रवाशाने हॉस्पिटलायझेशनशी संबंधित कागदपत्रे सादर करावी.

10/10

डॉक्टरांचा अंतिम अहवाल

Indian Railway Train Travel Insurance know How to Claim Marathi News

सर्व बिलांवर क्रमांक, सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे.रेल्वे अपघातातील मृत प्रवाशाचा तपशील असलेला अधिकृत अहवालही जोडावा लागेल. एनईएफटी तपशील आणि रद्द केलेला चेक देखील सबमिट करावा लागेल.