एका रेल्वे तिकिटावर 56 दिवस भारतात कुठेही फिरा;कसं करायचं बुकींग?
Pravin Dabholkar
| Aug 25, 2024, 08:58 AM IST
1/9
एका रेल्वे तिकिटावर 56 दिवस भारतात कुठेही फिरा;कसं करायचं बुकींग?
Indian Railways Circular Ticket: भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात, मोठ्या अंतरावर पोहोचता येते. त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे नवनवीन बदल करत असते. अशीच एक अपडेट रेल्वेकडून देण्यात आली आहे, ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.
2/9
रेल्वे तिकीट
रेल्वेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तिकीट बुकिंग सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये आरक्षण, जनरल, तत्काळ, चालू तिकीट यांचा समावेश आहे. सामान्यत: तिकिटाची वैधता एक दिवस असते. ट्रेन गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत आरक्षण तिकीट वैध असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल. पण ट्रेनच्या एका तिकिटावर तुम्ही 56 दिवसांपर्यंत प्रवास करू शकता? असे कोणी सांगितले तर विश्वास बसेल का? याबद्दल जाणून घेऊया.
3/9
तिकीट 56 दिवसांसाठी वैध
4/9
वेगवेगळ्या मार्गांवर प्रवास
5/9
कोणत्याही वर्गासाठी तिकिटे
तुम्हाला अनेक ठिकाणी प्रवास करायचा असेल, अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा प्लान असेल, तर तुम्हाला सर्क्युलर तिकीटचा फायदा घेता येईल. यासाठी तुम्हाला रेल्वेकडून कन्फर्म तिकीट घ्यावे लागेल. तिकीट सर्क्युलर प्रवासासाठी असावे. त्यानंतर तुम्ही या तिकिटावर पुढचे 56 दिवस ट्रेनने प्रवास करू शकता. कोचच्या कोणत्याही वर्गासाठी कोणीही सर्क्युलर तिकिटे खरेदी करू शकतो.
6/9
जास्तीत जास्त 8 थांबे
या तिकिटावर जास्तीत जास्त 8 थांबे असू शकतात. सर्क्युलर प्रवासाच्या तिकिटाद्वारे, तुम्ही त्याच तिकिटावर 56 दिवस प्रवास करू शकता. या तिकिटामुळे तुम्हाला एका तिकिटावर 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून प्रवास करण्याचे स्वातंत्र्य मिळते. या काळात तुम्ही अनेक ट्रेनमधून प्रवास करू शकता. कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्थानकांवर जाऊन तिकीट काढण्याची गरज नाही.
7/9
झोनल रेल्वेकडे अर्ज
जर तुम्हाला सर्क्युलर प्रवासाचे तिकीट घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम झोनल रेल्वेकडे अर्ज करावा लागेल. हे तिकीट तुम्हा तिकीट काउंटर किंवा IRCTC वेबसाइटवर बुकींग करुन मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रवासाची माहिती विभागीय रेल्वेला द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथून एक प्रमाणित परिपत्रक प्रवासाचे तिकीट दिले जाईल.
8/9
भाडे टेलिस्कोपिक दराने
9/9