Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?

Aug 25, 2024, 08:57 AM IST
1/8

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डिटॉक्सचा मार्ग स्वीकारतात. जर तुम्ही 3 दिवस सलग फळं खाल्ल्यास तुमच्या शरीरावर नेमकं काय परिणाम दिसतील ते पाहूयात 

2/8

तुम्ही फक्त फळांचं सेवन करत असाल तर 12 तासांनंतर तुमची पचनक्रिया सुधारण्यास सुरुवात होते. फळांमध्ये असलेले पोषक पचन आणि शोषून घेण्यास सुरुवात करते. आहारातील तंतू जळजळ कमी करुन पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते. 

3/8

खराब चरबी जाळण्यास 24 तासांनंतर सुरुवात होते. तुमचे शरीर पौष्टिक केटोसिसच्या स्थितीत प्रवेश करतो. म्हणजेच शरीरातील चरबी उर्जेसाठी वापरण्यास सक्षम होते. 

4/8

तुमची रोगप्रतिकार शक्तीही सुधारुन शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. मात्र पोषणासाठी केवळ फळांवर अवलंबून राहिल्याने आरोग्यास अनेक आव्हाने निर्माण होण्याची भीती असते. 

5/8

फक्त फळं खाल्ल्यामुळे पहिल्या दिवस तुम्हाला वजन कमी जाणवले. पण नंतर तुमचं वजन वाढेल. कारण फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर वजन वाढीस कारणीभूत ठरते. त्यामुळे तुम्ही फळं जास्त प्रमाणात खातात तेव्हा त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. 

6/8

ज्या लोकांना मधुमेह किंवा प्रीडायबेटिस आहे त्यांनी विचारपूर्वक फळांवर अवलंबून राहावं. कारण फळांमध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे किडनीच्या आजाराचा धोका संभवतो. 

7/8

फळांचा गोडवा हा दात खराब करण्यास कारणीभूत ठरु शकतो. संत्र्यासारखी काही फळे दात खराब करू शकतात. याशिवाय तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता बळावते. 

8/8

फक्त फळं खाल्ल्याने काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता जाणवते. जसे की व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयोडीन आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् यामुळे अशक्तपणा, थकवा, खराब प्रतिकारशक्तीची समस्या निर्माण होऊ शकते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)