Indian Army Day 2024 Wishes : भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने शेअर करा मॅसेज; लष्कराच्या शौर्याला सलाम
Indian Army Day 2024 Wishes in Marathi : दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिवस (Indian Army Day 2024) साजरा केला जातो. यावर्षी भारतीय सेना आपला 76 वा आर्मी डे साजरा करत आहेत. आजचा दिवस भारतीय लष्कराचा जज्बा, बहादुरी, शौर्य आणि साहसाला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे.
भारतीय सैन्य दिवस 15 जानेवारीलाच का साजरा केला जातो, जाणून घ्या. 15 जानेवारीलाच केएम करिअप्पा (K. M. Cariappa) यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची कमान घेतली. भारतीय लष्करासाठी (Indian Army) हा अत्यंत खास क्षण होता. या दिवशी प्रथमच देशाच्या लष्कराचे नेतृत्व भारतीयाच्या हाती आले. या कारणास्तव दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिन साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याने प्रथमच भारतीय लष्करी अधिकाऱ्याला कमांडर-इन-चीफ पद दिले. कमांडर-इन-चीफ हे तिन्ही सैन्यांचे प्रमुख आहेत. यंदा भारतीय लष्कर 76 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.
आजचा दिवस आपण प्रत्येकाने अभिमानाने साजरा करायला हवा. आपल्या लष्कराच्या शौर्याची गाथा आपण अभिमानाने शेअर करायला हवी. या निमित्ताने शेअर करा मॅसेजेस.