वाहनांना स्वेटर घातलं तर? स्कॉर्पिओ, विमानाचे फोटो पाहाच; Creativity पाहून भरेल हुडहूडी

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles: भारतात खास करुन उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आपल्याला थंडी वाजत असेल तर सर्वात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वेटर. थंडी घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय असलेलं स्वेटर हे मानवाबरोबरच चक्क गाड्यांना वापरलं तर काय होईल? पाहूयात याच संकल्पनेवर आधारित काही खास फोटो...  

Swapnil Ghangale | Jan 01, 2024, 12:07 PM IST
1/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

आपल्याला थंडी वाजली तर आपण काय करतो? शेकोटीच्या बाजूला उभे राहतो किंवा स्वेटर घालतो. मात्र थंडीमध्ये गाड्यांना स्वेटर घातले तर? ही कल्पना करुन असेच काही खास फोटो तयार करण्यात आलेत. कल्पनाशक्तीला चालना देणारे हे भन्नाट फोटो पाहूयात...

2/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

बुलेटला स्वेटर घातलं तर काय? असा प्रश्न पडला असेल तर हा फोटोच या प्रश्नाचं उत्तर आहे.

3/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

स्वेटरमधली रिक्षा पाहून तुम्हाला हसू आलं असेल पण खरोखरच रिक्षाला स्वेटर घातल्यास ती अशी दिसेल.

4/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

स्कुटीला घातलेलं स्वेटर हे असं दिसेल. कशी वाटली ही कल्पना?

5/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

ट्रकला स्वेटर घातलं तर ती अशी काहीशी दिसेल नाही का?

6/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

कोलकात्यातील या पिवळ्या टॅक्सीला पिवळं स्वेटर घातलं तर कळणार ही नाही असं या फोटोतून तरी दिसतंय.

7/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

भारतातील अनेक शहरांमध्ये चालणाऱ्या बसेसला स्वेटर घातलं तर असं चित्रच दिसेल.  

8/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

गाड्यांच्या गर्दीमध्ये सायकललाही स्वेटर घालता येईल. पण ते गाड्यापेक्षा फारच वेगळं दिसेल.

9/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

'वंदे भारत' ऐवजी या ट्रेनचं नाव 'थंडंय भारत' ठेवावं असं काहींचं म्हणणं आहे. मात्र खरोखरच भारतातील सर्वात आधुनिक ट्रेन स्वेटरमध्ये अशीच दिसेल ना?  

10/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कारपैकी एक असलेली स्कॉर्पिओ स्वेटरमध्ये गुंडाळल्यावर अशी दिसेल.

11/11

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles

विमानाला स्वेटर घातलं तर नक्कीच ते असं दिसेल. पंखांकडची बाजू नेव्हिगेशनसाठी अनकव्हर्ड ठेवल्यासारखं वाटतंय नाही? (सर्व फोटो - instagram/sahixd वरुन साभार)