31 डिसेंबरला पार्टी न करता 'या' ठिकाणी पोहोचली बॉलिवूड अभिनेत्री, सर्वत्र होतंय कौतुक

New Year 2024 Sonali Bendre: सोनाली बेंद्रेने यावर्षी पार्टी सोडून अध्यात्माकडे जाण्याचा निर्णय घेतला. ई-रिक्षाच्या सफरीसह तिने हरिद्वारला फॅमिली ट्रिप केली.

Pravin Dabholkar | Jan 01, 2024, 11:45 AM IST

New Year 2024 Sonali Bendre:सोनाली बेंद्रेने वर्षाची सुरुवात करण्यासाठी वेगळा आणि सर्वात अनोख मार्ग निवडला. 

1/8

New Year: पार्टी न करता अध्यात्माकडे, बॉलिवूड अभिनेत्रीचे सर्वत्र होतंय कौतुक

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

Sonali Bendre: 2023 वर्षाची  प्रत्येकाने आपापल्या परिने साजरी केली. विशेषतः बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सेलिब्रेशनकडे साऱ्यांचे लक्ष होते. अनेक सेलिब्रिटींनी कुटुंब आणि आपल्या मित्रांसोबत 31 डिसेंबर सेलिब्रेशन केले. जवळजवळ प्रत्येक सेलिब्रिटी उत्सवाच्या मूडमध्ये दिसला. दरम्यान एक अभिनेत्री या साऱ्यापासून दूर दिसली. तिचे सोशल मीडियात खूप कौतुक होत आहे.

2/8

पती आणि मुलासह हरिद्वारला

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

सामान्यांपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत सर्वांनी 2024 चे स्वागत करण्यासाठी जोरदार पार्टी केल्या. बहुतेक सेलिब्रिटींनी कुटुंब आणि मित्रांसोबत पार्टी करणे पसंत केले. पण अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या पती आणि मुलासह हरिद्वारला गेली आहे. सोनालीने तिचा मुलगा आणि पतीसोबतच्या नवीन फोटो शेअर केले आहेत. 

3/8

पार्टी सोडून अध्यात्माकडे

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

सोनाली बेंद्रेने वर्षाची सुरुवात करण्यासाठी वेगळा आणि सर्वात अनोख मार्ग निवडला. कारण अभिनेत्रीने यावर्षी पार्टी सोडून अध्यात्माकडे जाण्याचा निर्णय घेतला. ई-रिक्षाच्या सफरीसह तिने हरिद्वारला फॅमिली ट्रिप केली. याची माहिती देताना सोनालीने काही फोटोही शेअर केले आहेत. 

4/8

एकत्र कुटुंब पाहून आनंद

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहलसोबत हरिद्वारला पोहोचली आहे. सोनालीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि काही मिनिटांतच ते व्हायरल झाले. मुलगा आणि पतीसोबत एकत्र कुटुंब पाहून लोक तिची प्रशंसा करत आहेत.

5/8

ई-रिक्षाची सफर

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

अशा प्रकारे सोनाली बेंद्रेने हरिद्वारमध्ये तिचे नवीन वर्ष साजरे केले. सोनालीने तिच्या इंस्टाग्रामवर पवित्र शहर हरिद्वारचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, सोनालीने पती ाणि 18 वर्षांचा मुलगा रणवीरसोबत तिची ई-रिक्षाची सफर दाखवली. 

6/8

गंगेची आरती

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

या फोटोत आई आणि मुलगा दोघेही हसत होते. एका फोटोत तिघांनीही माता गंगेची आरती केली. 'हरिद्वारमध्ये ई-रिक्षा, केबल कार राईड, सर्वात आश्चर्यकारक गंगेची आरती... काय दिवस आहे.' असे कॅप्शन तिने फोटोला दिले.

7/8

सोनाली बेंद्रेचे करिअर

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

सोनाली बेंद्रेने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या उत्कृष्ट अभिनयाचे नेहमीच कौतुक झाले आहे. 'हम साथ साथ हैं', 'जख्म', 'सरफरोश', 'दिलजले' आणि अनेक मोठे चित्रपट कोणी विसरु शकत नाही. 

8/8

कॅन्सरशी झुंज

New Year 2024 Sonali Bendre reached Haridwar to celebrate New Year without partying

48 वर्षीय अभिनेत्रीने स्टेज 4 कॅन्सरशीही झुंज दिली आहे. तिने चित्रपट निर्माता गोल्डी बहलशी लग्न केले आहे. त्यांना रणवीर बहल नावाचा 18 वर्षांचा मुलगा आहे.