Ind vs Eng T20 : या खेळाडूंना घेऊन इंग्लंडला टफ फाईट देणार टीम इंडिया

स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतीय संघाचा मोठा पराभव केला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  टीम इंडियाच्या Playing XI मध्ये असू शकतात हे खेळाडू    

Mar 14, 2021, 10:00 AM IST
1/11

शिखर धवन

शिखर धवन

रोहित शर्मा ऐवजी शिखर धवनला पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.पहिल्या सामन्यात केवळ 4 धावा त्याने केल्या होता. आता त्याला पुन्हा एक दमदार कामगिरी करण्याची संधी देण्यात आली आहे. 

2/11

विराट कोहली

विराट कोहली

विराह कोहली यावेळी तरी आपलं धावांचं खातं उघडेल अशी अपेक्षा आहे. मागच्या सामन्यात शून्यवर आऊट झाल्यामुळे चाहत्यांकडून टीकेचा सामना करावा लागला होता.

3/11

श्रेयस अय्यर

 श्रेयस अय्यर

पहिल्या सामन्यात 67 धावांची खेळी करणारा श्रेयस अय्यर पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर जाऊ शकतो. पहिल्या सामन्यात अय्यरने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.

4/11

ऋषभ पंत

ऋषभ पंत

भारताच्या कसोटी मालिकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ऋषभ पंतला  पहिल्या टी -२० मध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र तो कॅचआऊट झाल्यामुळे त्याला आणखी चांगली खेळी करता आली नाही.

5/11

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील भारताचा सर्वात मोठा सामना विजेता हार्दिक पांड्या 6 व्या स्थानावर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

6/11

वाशिंगटन सुंदर

वाशिंगटन सुंदर

वॉशिंग्टन सुंदर ऑलराऊंडर रुपात सातव्या क्रमांकावर उतरेल. इंग्लंडच्या फलंदाजांना देखील जेरीस आणण्याची त्याच्या खांद्यावर महत्त्वाची भूमिका गोलंदाजी दरम्यान असणार आहे. 

7/11

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरची पुन्हा ओळख होऊ शकते. शार्दुल गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये धावा करू शकतो.

8/11

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार हा संघातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. दुसर्‍या सामन्यात भुवनेश्वरच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजी युनिट चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

9/11

केएल राहुल

केएल राहुल

दुसऱ्या सामन्यासाठी काही बदल होऊ शकतात अशी चर्चा आहे. फलंदाजीची सुरुवात के एल राहुलवर असणार आहे. टी 20 क्रिकेटमधील विश्वासू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 

10/11

दीपक चाहर

दीपक चाहर

दीपक चहरला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली नव्हती मात्र दुसऱ्या सामन्यात ही मिळण्याची शक्यता आहे.

11/11

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

टी -२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा युजवेंद्र चहल दुसर्‍या सामन्यात स्पिनर गोलंदाजी करू शकतो.