विराट कोहली आणि ११ नंबर यांच काय आहे खास कनेक्शन?

राष्ट्रीय कर्तव्य ते वडिलांचं कर्तव्य सांभाळणारा विराट कोहली 

Dakshata Thasale | Jan 16, 2021, 13:21 PM IST

मुंबई : राष्ट्रीय कर्तव्य ते वडिलांचं कर्तव्य बजावणारा विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आता एका गोंडस चिमुकलीचे आई-वडिल झाले आहेत. कोहलीने ११ जानेवारी रोजी अतिशय गोड बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतलेल्या विराट कोहलीची बाळाच्या जन्माअगोदरच पॅरेंटिंग सुट्टी मंजुर झाली होती. त्यानंतर तो पूर्णपणे अनुष्कासाठी उपलब्ध झाला. त्याचा सगळा वेळ हा अनुष्का आणि होणाऱ्या बाळाकरता होता. 

२०१३ साली विराट आणि अनुष्का एका जाहिरातीकरता भेटले. त्यानंतर ते अनेकदा कार्यक्रम, क्रिकेट सामन्यात, पार्टी, गेट टूगेदरमध्ये भेटले. आणि त्यांचे एकत्र असल्याचे फोटो पापाराजी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. विराट आणि अनुष्का चाहत्यांचे अतिशय फेव्हरेट कपल झाले. 'Power Couple' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोघांना Virushka नावाने संबोधलं जाऊ लागलं. 

नुकतेच पालक झालेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या ११ जानेवारीला जन्माला आलेल्या आपल्या लेकीसोबत वेळ घालवत आहेत. पाहूया काय आहे विराट आणि ११ नंबरचं खास कनेक्शन? 

1/5

विराट कोहलीचा वाढदिवस महिना

विराट कोहलीचा वाढदिवस महिना

भारतीय कर्णधार विराट कोहली ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्माला आहे. वर्षाच्या नोव्हेंबर म्हणजे ११ व्या महिन्यात विराट कोहलीचा जन्म झाला. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाणारा कोहली जेव्हा क्रिकेट बॅट उचलली तेव्हा त्याने स्विंग करायला सुरूवात केली. आणि वडिलांना त्याच्याकडे गोलंदाजी करायला सांगितले.

2/5

विरुष्काच्या लग्नाची तारीख

विरुष्काच्या लग्नाची तारीख

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी २०१७ साली लग्न केलं. महत्वाची बाब म्हणजे ११ डिसेंबर रोजी विरूष्काचं इटली येथे अतिशय खासगी लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अतिशय जवळची मंडळी आणि मित्रपरिवार उपस्थित होता. हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. 

3/5

विराट कोहली गोंडस मुलीचा बाबा

विराट कोहली गोंडस मुलीचा बाबा

या आनंदी जोडप्याने आपल्या घरी ११ जानेवारी २०२१ रोजी एका चिमुकलीचं स्वागत केलं. विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी शेअर केली. सोमवारी दुपारी अनुष्काने चिमुकलीला जन्म दिला. अनुष्का आणि लेक दोघींच आरोग्य उत्तम असून आम्ही खूप आनंदी आहोत, अशी माहिती विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. यानंतर कोहली कुटुंबातील अनेकांनी आपल्या घरात परीचं आगमन झाल्याचं सांगत आनंद व्यक्त केल्या.   

4/5

३७ सामन्यात ११ शतके

 ३७ सामन्यात ११ शतके

२०१८ मध्ये विराट कोहलीने ३७ सामन्यात ११ शतके केली. त्या कॅलेंडर वर्षात त्याने नऊ अर्धशतकेही केली आहे. 

5/5

विराट कोहली ICC Tournaments करता खेळला

विराट कोहली ICC Tournaments करता खेळला

भारतातील आगामी टी -२० विश्वचषक हे कोहलीचे ११ वे आयसीसी टूर्नामेंट असेल. अंडर-१९ पासून कर्णधाराने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत विराटने देशासाठी अनेक सामने जिंकले आहेत.