Corona Vaccination ला मुंबईत अशी झालीय सुरुवात, पाहा फोटो

कोरोना लसीकरणाला आज देशभरातून एकाच वेळी सुरुवात होतेय. मुंबईतील विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय देखील लसीकरणासाठी सज्ज झालंय. 

Jan 16, 2021, 09:56 AM IST

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : कोरोना लसीकरणाला आज देशभरातून एकाच वेळी सुरुवात होतेय. मुंबईतील विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय देखील लसीकरणासाठी सज्ज झालंय. 

1/4

पंतप्रधान साधणार संवाद

पंतप्रधान साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्लयातील कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर याठिकाणी लस देण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे.

2/4

आनंद गगनात मावेना

आनंद गगनात मावेना

आज सकाळी लसीकरण केंद्रात लस आणली गेल्यानंतर नर्सेसनी त्याची पूजा केली. तसेच आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवले.

3/4

नऊ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर लसीकरण

नऊ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर लसीकरण

नऊ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर लसीकरण केले जातंय. त्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मुंबईतील 9 केंद्रांमध्ये जवळपास 12,500 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरण करण्यात येणार आहे.

4/4

लसीकरणाच्या कुप्यांचं वाटप

लसीकरणाच्या कुप्यांचं वाटप

एफ दक्षिण प्रभागातून लसीकरणाच्या कुप्यांचं वाटप होणार असून महापालिकेच्या लोकमान्य टिळक, नायर, केईएम, कूपर, कांदिवलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरचं राजावाडी, सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई, वांद्र्यातील भाभा रुग्णालय आणि बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.