QR कोडचा फुल फॉर्म माहितीये का? दिवसातून 10 वेळा स्कॅन करणाऱ्यांनाही माहित नसेल

QR Code Full Form : डिजिटल युगात QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॉपिंग, डिजिटल पेमेंट इत्यादींसाठी तसेच कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी देखील QR कोडचा वापर केला जातो. QR कोडमुळे आपली दैनंदिन काम अतिशय सोपी केली आहेत. पण तुम्हाला माहितीये का QR कोडचा फुलफॉर्म काय असतो?

Pooja Pawar | Jan 20, 2025, 15:47 PM IST
1/7

QR कोड हा एक प्रकारचा बारकोड असतो जो काळ्या आणि पांढऱ्या रंगाने लिहिलेला असतो. हा QR कोड तुम्ही मोबाईलद्वारे स्कॅन करून वाचू शकता. याची विषेशबाब ही की त्यात मोठ्या प्रमाणात डेटा स्टोर करता येतो. उदा. टेक्स्ट, वेबसाइट लिंक, संपर्क क्रमांक आणि पेमेंट डिटेल्स.

2/7

QR कोड काम कसं करतं?

डेटा एन्कोडिंग : QR कोडमध्ये माहिती ही एन्कोडेड फॉर्ममध्ये स्टोर असते. ही माहिती बायनरी स्वरूपात आहे जी मशीनद्वारे स्कॅन करून सहज वाचता येते.

3/7

स्कॅनिंग :

QR कोड वाचण्यासाठी स्मार्टफोनमधील कॅमेरा आणि QR स्कॅनिंग अँप किंवा इनबिल्ट फीचरचा उपयोग केला जातो. 

4/7

डिकोडिंग :

 QR कोड स्कॅन केल्यावर अँप याला डिकोड करत आणि त्याची माहिती समजून योग्य प्रकारे प्रदर्शित करतं. 

5/7

QR कोड वापरण्याचे फायदे :

QR कोड वापरल्यामुळे स्कॅन केल्यावर लगेचच माहिती प्राप्त होते. QR कोड हा एक सुरक्षित उपाय आहे तसेच यासाठी फार पैसे सुद्धा खर्च होतं नाहीत. 

6/7

QR कोडचा फुल फॉर्म :

QR कोडचा फुल फॉर्म Quick Response असा आहे. QR कोड 1994 मध्ये जपानच्या Denso Wave या कंपनीने विकसित केला होता. 

7/7

जपानच्या Denso Wave कंपनीने QR कोड यासाठी विकसित केला होता की हे हाय स्पीडने डेटा स्कॅन करून लगेच माहिती देऊ शकते.