भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गावर रेल्वे ब्रीज, ब्रीजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रो
या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कामठीहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्याने त्याची वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे.
Four-level Transportation Structure in Nagpur : भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात उभी राहिली आहे. नागपूरमधील गड्डीगोदाम येथे चार स्तरीय वाहतूक व्यवस्था पहायला मिळत आहे. एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक 5.67 किमी लांबीचा डबल डेकर उड्डानपुल आजपासून (शनिवार)सुरु होणाराय . या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
1/9
2/9
स्थापित करण्यात आलेल्या 800टन वजनाच्या स्टील गर्डरला 3200 एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला असून संपूर्ण स्ट्रकचरला80000 बोल्टचा वापर केला गेला. जमिनीपासून स्टील गर्डरची उंची 25 मीटर एवढी आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच 22 मीटर रुंद स्टील गर्डर स्थापित करण्यात आला. देशात पहिल्यांदा 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था स्थापित केली गेली.
3/9
महा मेट्रो निर्माण कार्य करत भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 80 मीटर लांब व 1650टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच केले होते. जे नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची नोंद झाली होती. भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 1650 टन वजनाचे स्टील गर्डर स्थापित होणे हा अनोखा रेकॉर्ड आहे.देशात पहिल्यांदाच 1650 टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात करण्यात आले.
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9