Ind vs Eng: टीम इंडियाचा विजयाचा मार्ग खडतर, इंग्लंडच्या 6 तरबेज खेळाडूंशी गाठ

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 मालिकेतील दुसरा सामना आज होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ मैदानात आज भिडणार आहेत. इंग्लंडनं मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली असून भारतीय संघासमोर मालिका जिंकण्याचं तगडं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या हातून कसोटी मालिका सुटल्यानंतर टी 20 सीरिज जिंकण्यासाठी संघात मोठे बदल केले आहेत. 6 तरबेज खेळाडूंचा सामना भारतीय संघाला करावा लागणार आहे. 

Mar 14, 2021, 12:35 PM IST
1/6

जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चर

जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी जोफ्रा आर्चर दुसर्‍या टी -20 मध्ये भारतासाठी मोठा धोका बनू शकतो. पहिल्या सामन्यातही आर्चरने सर्वाधिक 3 बळी घेतले. अशा परिस्थितीत भारताला आर्चरबरोबर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

2/6

बेन स्टोक्स

बेन स्टोक्स

जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला बेन स्टोक्स आहे. स्टोक्सला बॉल आणि फलंदाजीमध्ये हरवणं टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे. भारताला मालिकेत जिंकायचं असेल तर स्टोक्सला शांत ठेवणं गरजेचं आहे. 

3/6

जोस बटलर

जोस बटलर

तुफान फटके लावणारा फलंदाज जोस बटलरची बॅट फिरू न देण्याचं आव्हान भारतीय संघातील गोलंदाजांपुढे असणार आहे.

4/6

डेव्हिड मलान

डेव्हिड  मलान

टी 20मधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज डेव्हिड मालनने शेवटच्या सामन्यात षटकार मारत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मालनने अगदी अल्पावधीतच क्रिकेट विश्वात मोठे नाव कमावलं आहे.

5/6

इयोन मोर्गन

इयोन मोर्गन

इंग्लंला 50 ओव्हरमध्ये पहिला विश्व कप जिंकवून देणारा इयोन मॉर्गन हा मिडल ऑर्डर खेळाडू आहे. मॉर्गनची बॅट फिरली की तो धडाधड षटकार मारत सुटतो. त्यामुळे भारतीय संघासाठी ते धोक्याचं ठरू शकतं. 

6/6

जगातील सर्वात वेगवान सलामीवीर फलंदाजांपैकी एक, जेसन रॉयने पहिल्या टी -20 मध्ये भारतीय गोलंदाजांच्या चेंडूवर बऱ्याच धावा केल्या. पहिल्या सामन्यात रॉयने 49 धावा करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दुसरा सामना जिंकण्यासाठी रॉयला बाद करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.