Shakib Al Hasan Love Story: भल्या-भल्या हिरोईन पडतील फिक्या! क्रिकेटरने बायकोसाठी बिझनसमनला का धुतलं होतं?

Shakib Al Hasan Love Story: बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याने गुरुवारी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - बांगलादेश सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शाकिबच्या क्रिकेट करिअर सोबतच त्याची लव्ह स्टोरी सुद्धा खूप विशेष आहे. तेव्हा शाकिब आणि त्याच्या पत्नीच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात.      

Pooja Pawar | Sep 26, 2024, 17:43 PM IST

 

 

1/6

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला तर दुसरा सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे पार पडणार आहे. यापूर्वीच शाकिबने त्याच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शाकिब हा एक राजकारणी सुद्धा आहे.   

2/6

शाकिब अल हसनने अनेक वर्ष बांगलादेशचे नेतृत्व केले. ऑल राउंडर खेळाडू असलेल्या शाकिबने बांगलादेशसाठी एकूण 129 सामने खेळले असून यात त्याने 2551 धावा आणि 149 विकेट्स घेतल्या. वनडेत 247 सामने खेळताना त्याने 7570 धावा केल्या आणि 317 विकेट्स घेतल्या. तर टेस्ट क्रिकेटमध्ये 70 सामन्यात त्याने 4600 धावांची खेळी केली आणि 242 विकेट्स घेतल्या. 

3/6

शाकिब आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी सुद्धा खूप रोमँटिक आहे. शाकिब अल हसन याच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर असे असून ती एक सॉफ्टवेयर इंजीनियर आहे. शाकिबची पत्नी उम्मी हिने मॉडेलिंग सुद्धा केले आहे. उम्मी ही मूळ बांगलादेशची असून ती काही वर्षांपूर्वीच अमेरिकेत शिफ्ट झाली.    

4/6

शाकिब आणि उम्मीची पहिली भेट सुद्धा खूप खास झाली होती. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट काउंटी क्रिकेट दरम्यान झाली जेव्हा शाकिब तेथे सामन्यासाठी गेला होता. मग त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्याच रूपांतर प्रेमात होऊन दोघे एकमेकांना डेट करू लागले.   

5/6

2012 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. शाकिब आपल्या पत्नीशी किती प्रेम करतो याचा अंदाज सर्वांना 2014 मध्ये झालेल्या भारत - बांगलादेश सामन्यादरम्यान आला. हा सामना पाहण्यासाठी शाकिबची पत्नी सुद्धा आली होती. यावेळी एका बिझनेसमॅनने उम्मीशी गैरवर्तन केले. याची माहिती मिळताच शाकिबला राग अनावर झाला आणि त्याने बिझनेसमॅनला मारहाण केली.   

6/6

शाकिब आणि उम्मीच्या लग्नाला 11 वर्ष झाले असून दोघांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखात सुरु आहे. शाकिबचं वय सध्या 37 वर्ष असून तो सध्या त्याच्या  करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे.