'जिओ'कडून सर्व Users ला मोठा Alert.. 'या' Numbers वरुन आलेल्या कॉल, मेसेजपासून सावध

Important Warning For Jio Users: मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या जिओकडून सर्व ग्राहकांना यासंदर्भातील इशारा देणारे मेसेज पाठवले जात आहेत. नेमकं या मेसेजमध्ये काय म्हटलं आहे आणि कसला इशारा देण्यात आलाय जाणून घ्या....

| Sep 13, 2024, 15:55 PM IST
1/10

jiousers

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून यासंदर्भातील इशारा दिला आहे. नेमकं घडलंय काय, झालंय काय जाणून घेऊयात...

2/10

jiousers

भारतामध्ये सर्वाधिक वापरकर्ते असलेल्या रिलायन्स जीओने आपल्या युझर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. काही विशिष्ट क्रमांकांवरुन येणाऱ्या कॉल आणि मेसेजपासून सावध राहण्याचा इशारा मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्सची उपकंपनी असलेल्या जिओने ग्राहकांना दिला आहे.

3/10

jiousers

रिलायन्स जीओने आपल्या युझर्सला +92 पासून सुरु होणाऱ्या क्रमांकावरुन येणाऱ्या कॉल आणि मेसेजपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.  

4/10

jiousers

जिओने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये, "+92 पासून सुरु होणाऱ्या क्रमांकावरुन येणाऱ्या फोन आणि मेसेजपासून सावध राहा. या क्रमांकावरुन संपर्क साधणारी व्यक्ती तुम्हाला ते पोलीस असल्याचा दावा करु शकतात," असं जिओने म्हटलं आहे.  

5/10

jiousers

"या क्रमांकावरुन फोन आल्यास 1930 क्रमांकावर फोन करा आणि तक्रार नोंदवा," असा सल्ला जिओने ग्राहकांना मेसेजमधून दिला आहे. 

6/10

jiousers

+92 क्रमांकावरुन खोटे दावे करणारे फोन आले तर, cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन सायबर क्राइमसंदर्भातील तक्रार नोंदवा, असंही जिओने मेसेजमध्ये म्हटलं आहे.

7/10

jiousers

पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करुन लोकांकडून खासगी माहिती, ज्यामध्ये पासवर्ड, ओटीपी, कार्ड क्रमांक यासारख्या गोष्टी घेऊन फसवणूक करु शकतात. या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या न कळत त्याच्या खात्यावरुन आर्थिक अपहार केला जाऊ शकतो.

8/10

jiousers

मध्यंतरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने म्हणजेच सीबीआयने लोकांना फसवणूक करणाऱ्यांकडून येणाऱ्या कॉलची संख्या वाढल्याचं सांगितलं होतं. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार फारच वाढले आहेत, असं संस्थेनं म्हटलं आहे.   

9/10

jiousers

पोलीस अधिकारी बोलत असल्याचा दावा करत एखाद्या व्यक्तीने फोन केला तर त्यांच्याकडे त्यांचा बॅच क्रमांक विचारा. तसेच डिपार्टमेंटचं नाव, फोन नंबर विचारा. त्यानंतर अधिकृत माध्यमातून ही माहिती पडताळून पाहा. सोशल सिक्युरिटी नंबर, बँक अकाऊंट नंबर, क्रेटीड कार्डची माहिती फोनवरुन देणं टाळा.

10/10

jiousers

खरे पोलीस अधिकारी कधीच तातडीने कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देण्याचा आग्रह करत नाहीत. कोणी लगेच पैसे द्या सांगत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल शंका असेल तर वाट पाहा आणि अधिकृत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घ्या.