Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps

Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.   

Feb 28, 2023, 10:58 AM IST

Railway Ticket Booking : हल्ली नोकऱ्यांची वेळापत्रकंच इतकी गोंधळवणारी असतात, की कुठंही जायचा बेत आखायचा झाला तरीही ते शक्य होत नाही. बेत आखले जातात ते अगदी शेवटच्याच क्षणी. पण, असं आयत्या वेळी कुठंही जायचं म्हटलं की तिथं रेल्वेनं जायचं झाल्यास तिकीट देणार कोण? हाच प्रश्न अनेकांपुढे उभा राहतो. मग सुरु होते एजंटची शोधाशोध, किंवा मग ओळखीतल्या कुणालातरी गाठण्याची गडबड. 

 

1/6

Railway Ticket rates

hwo to book a Tatkal train Ticket Booking know details

प्रत्येक रेल्वेमध्ये तुम्ही आयत्या वेळी ही तिकीटं बुक करू शकता. यासाठीच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात. या तिकीटासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागू शकतं. म्हणजे तिकीटाचे सर्वसामान्य दर 900 रुपये आहेत, तर तुम्हाला त्यासाठी 1300 रुपयेही भरावे लागू शकतात.   

2/6

IRCTC

hwo to book a Tatkal train Ticket Booking know details

तिकीट काढण्यासाठी irctc.co.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. तिथं लॉगईन करा. तुमचं अकाऊंट नसल्यास आधी तिथं नोंदणी करून घ्या. 

3/6

Railway Ticket booking app

hwo to book a Tatkal train Ticket Booking know details

यानंतर Book Ticket हा पर्याय निवडा. तिथं Tatkal हा पर्याय निवडा आणि तुम्हाला जायचंय ते स्थानक, तुम्ही कुठून निघणार ते स्थानक आणि प्रवासाची वेळ अशी माहिती भरा.   

4/6

Railway Ticket booking process

hwo to book a Tatkal train Ticket Booking know details

तुमच्या वेळेत असणारी रेल्वे निवडून अपेक्षित श्रेणीचं (Class) तिकीट निवडा. पुढे प्रवाशांच्या माहितीचा तपशील भरा. 

5/6

how to book a Railway Ticket

hwo to book a Tatkal train Ticket Booking know details

इथं तुम्हाला हवा तो बर्थ निवडण्याचं स्वातंत्र्य असलं तरीही रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हाला तोच बर्थ मिळेल याची मात्र शाश्वती नाही.   

6/6

Railway Ticket

hwo to book a Tatkal train Ticket Booking know details

तत्काळ तिकीट काढताना तुम्ही Credit Card, Debit Card, Net Banking, UPI आणि इतर उपलब्ध पर्यायांनी तिकीटाचे पैसे भरू शकता.