जेजुरी गडाच्या पायथ्याशी असेलले रहस्यमयी ठिकाण; जमिनीच्या पोटात 60 फूट खोल दडलेले गुप्त मंदिर

जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी जमिनीच्या पोटात बांधलेले एक रहस्यमयी मंदिर आहे.   

| Dec 30, 2024, 23:35 PM IST

Ballaleshwar Temple Jejuri : जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात. जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी एक रहस्यमयी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर  जमिनीच्या पोटात 50 फूट खोल बांधलेले आहे. जाणून घेऊया या अनोख्या मंदिराविषयी.

 

1/8

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी जमिनीच्या पोटात 60 फूट खाली बांधलेले एक अप्रतिम मंदिर आहे.

2/8

शिवलींगा खालील पुढील बाजूने गोमुखातून पाणी पुष्करणीत पडते.  या आवाजाने येथील धीरगंभीरता अधिक जाणवते. तलावातील पाणी तटबंदीतून आत उतरणाऱ्या जिन्या मधील दट्यानी नियंत्रित केले जाते. व गोमुखातून पाणी पुष्करणीत पडते.

3/8

तलावाच्या तटबंदी मधील पायऱ्यांच्या रस्त्याने थेट मंदिरात व मंदिरावरील सज्जा मधेही जाता येते. मुख्य प्रवेश पूर्वेकडून असून पुष्करणी मध्ये जाताना प्रथम नंदी दिसतो या नंदी वर दगडी मंडप असावा असे तेथील खुणावरून दिसते.     

4/8

 पुष्करणीत येणारे पाणी शेताला सोडण्यासाठी जलव्यवस्थापन केले आहे.  रमणा परिसर व गडाचे पश्चिमेकडील भागातील पाणी या तलावात येते.

5/8

तलावाच्या दगडी बांधकामातच या पुष्करणीची व त्यामध्ये आकर्षक मंदिराची उभारणी केली आहे. पुष्करणीत येणारे पाणी शेताला सोडण्यासाठी जलव्यवस्थापन करण्यात आले आहे. 

6/8

जेजुरी गडावरून पाहिल्यानंतर पूर्वेकडे भव्य गोलाकार पेशवे तलाव दिसतो. या तलावाच्या पूर्वेकडील काठावर तलावाच्या तटबंदीमध्ये जमिनीच्या पोटात साठ फूट खोल दगडी बांधकामातील हे ऐतिहासिक मंदिर दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.  

7/8

 पुण्यापासून 50  किलोमीटर अंतरावर जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेलल्या  पेशवे तलावाच्या काठावर जमिनीच्या आता असलेल्या या रहस्यमयी मंदिराचे नाव आहे श्रीबल्लाळेश्‍वर मंदिर आहे.

8/8

जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या जवळपास 270 वर्षांपूर्वी बांधलेल्या पेशवे तलावाजवळ जमिनीखाली हे मंदिर दडलेले आहे.  37 एकर क्षेत्र व्यापलेला हा जलाशय थोरले बाजीराव पेशवे यांनी इस 1737 ते 1740 दरम्यान बांधला.