राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांना संपत्तीतील एक रुपयाही दिला नाही; मग कोणाच्या नावे केली सगळी संपत्ती?

बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी आपल्या मृत्यूपत्रात पत्नी डिंपल कपाडिया यांना संपत्तीमधील एक रुपयाही दिला नाही. पण मग त्यांनी आपली संपत्ती नेमकी कोणाच्या नावे केली.   

| Dec 30, 2024, 18:35 PM IST

बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी आपल्या मृत्यूपत्रात पत्नी डिंपल कपाडिया यांना संपत्तीमधील एक रुपयाही दिला नाही. पण मग त्यांनी आपली संपत्ती नेमकी कोणाच्या नावे केली. 

 

1/10

राजेश खन्ना केवळ त्यांच्या कारकिर्दीमुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यासामुळेही खूप चर्चेत राहिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्ना डिंपल कपाडियासोबत लग्न करण्यापूर्वी अंजू महेंद्रूसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.   

2/10

असं म्हणतात की राजेश खन्ना अंजूच्या प्रेमात वेडे होते. रिपोर्टनुसार, राजेश खन्ना तिच्याबद्दल फार पझेसिव्ह होते. अंजूने चित्रपटात काम करु नये असं त्यांना वाटायचं. अंजूने आपल्यासह लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती.   

3/10

मात्र दोघांचं एकमत होऊ शकलं नाही आणि त्यांचं नातं तुटलं.  

4/10

अंजूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केलं. राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रूला डिवचण्यासाठी तिच्या घरासमोरुन लग्नाची मिरवणूक काढल्याचं बोललं जातं.   

5/10

डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एक ट्विंकल खन्ना आणि दुसरी रिंकी खन्ना आहे. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले राहिले नाही. या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या वारंवार आल्या.   

6/10

राजेश खन्ना यांना त्यांच्या शेवटच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. ते बरेच दिवस आजारी होते.   

7/10

असं म्हटलं जातं की राजेश खन्ना यांना मृत्यू जवळ आल्याची कल्पना होती आणि त्यादरम्यान त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र केले होते.   

8/10

यासिर उस्मान यांच्या 'कुछ तो लोग कहेंगे' या पुस्तकात सांगण्यात आलं आहे की, मृत्युपत्रात डिंपल यांच्या नावाचा काहीही उल्लेख नव्हता, कारण त्यांना काहीही नको होते.  

9/10

डिंपल कपाडिया यांना मृत्यूपत्राबद्दल विचारलं असता, त्यांनी राजेश खन्ना यांना मला काहीही नको, तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते मुलींना द्या असं सांगितलं होतं.   

10/10

राजेश खन्ना यांनी डिंपल यांचा सल्ला मान्य केला आणि कोट्यवधींची मालमत्ता त्यांच्या दोन मुलींना हस्तांतरित केली. यामुळे डिंपल कपाडिया यांच्या नावे एक रुपयाही नव्हता.