भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, एकावेळी थांबतात 23 ट्रेन, देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातही जाता येते

भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते आहे ते जाणून घेऊया. 

| Jun 27, 2024, 20:52 PM IST

India Biggest Railway Station: देशभर भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. देशाचा कानाकोपरा हा रेल्वेने जोडला गेला आहे. भारतात अनेक लहान मोठे रेल्वे स्टेशन आहेत. भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकावर एकाचवेळी 23 ट्रेन थांबतात. 

1/7

 रेल्वे नेटवर्कमध्ये भारत देश हा जगात चौथ्यास्थानावर आहे. भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे जिथे एकावेळेला 23 ट्रेन थांबतात. 

2/7

हावडा रेल्वे जंक्शन हे भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.   1854 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने  पश्चिम बंगालमधील हावडा शहरात हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे स्टेशन बांधले. 

3/7

हावडा रेल्वे जंक्शन हे स्टेशन भारतातील सर्वाक व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. 24 तासात या रेल्वे स्थानाकतून 600 पेक्षा अधिक ट्रेन थांबतात.

4/7

हावडा रेल्वे जंक्शनवर 26 रेल्वे ट्रॅक आहेत. तर, या स्टेशनवरुन एकावेळी 23 ट्रेन थांबतात. 10 लाखांपेक्षा अधिक प्रवासी करतात. 

5/7

हावडा रेल्वे जंक्शनवरुन भारताच्या कानाकोपऱ्यात ट्रेन जातात. इतकचं नाही तर परदेशात जाण्यासाठी देखील  हावडा रेल्वे स्टेशनवरुन ट्रेन मिळते.   

6/7

हावडा रेल्वे जंक्शन असे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.  हावडा रेल्वे जंक्शन हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. 

7/7

भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन दिल्ली किंवा मुंबईमध्ये नाही तर  पश्चिम बंगालमध्ये आहे.