श्वानांचे किती रक्त गट असतात? त्यांचं रक्तदान होतं का?

Dogs Blood Groups : मनुष्याला जेव्हा रक्तदान केलं जातं तेव्हा चार प्रमुख रक्त गटांचा विचार केला जातो.  A, B, AB आणि O हे प्रमुख रक्तगट आहेत. कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट त्याच्या जनुकांच्या जोड्यांवरून ओळखला जातो. पण तुम्हाला माहित आहे का श्वानांमध्ये किती रक्तगट असतात.

| Jun 27, 2024, 20:03 PM IST
1/5

बुधवारी इन्स्टाग्रामवर टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी एका आजारी श्वानाचा फोटो शेअर करत रक्तदानाचं आवाहन केलं होतं. रतन टाटा यांच्या आव्हाननंतर आपल्या श्वानांसह रक्तदात्यांची रांग लागली. यानिमित्ताने श्वानांचे रक्तगट कोणते असतात आणि त्यांचं रक्तदान होतं का याची उत्सुक वाढली आहे.   

2/5

श्वानांचे मुख्यत: 7 रक्त गट असतात. तर मांजरांमध्ये चार रक्त गट असतात. श्वानांमध्ये असलेल्या रक्त गटांची नावं  DEA 1.1, 1.2, 1.3, DEA4, DEA3, DEA5 आणि  DEA6 अशी आहेत. डीईए चा अर्थ डॉग एरिथ्रोसाइट एंटीजन. श्वानांमध्ये सर्वात सामान्य रक्त गट DEA 1.1 आहे.

3/5

याचा अर्थ ज्या श्वनांचा रक्तगट DEA1.1 आहे ते त्याच रक्तगटाच्या श्वानांना रक्तदान करू शकतात. साधारणपणे जर्मन शेफर्ड, डॉबरमन, पिटबुल्स, बॉक्सर्स, आयरिश वुल्फहाऊंड्स आणि ग्रेहाऊंड्स प्रजातींच्या कुत्र्यांचा DEA1.1 निगेटीव्ह रक्तगट असतो.

4/5

लेब्रोडोर आणि गोल्डन रेट्रीव्हर जातीच्या श्वानांचा DEA1.1 पॉजिटिव्ह रक्त गट  असतो. सर्व श्वानांमध्ये DEA4 लाल पेशी प्रथिनं असतात.  DEA4 लाल पेशी प्रथिनं असलेले श्वान युनिव्हर्सल डोनर असतात. म्हणजे या रक्तगटाचे श्वान कोणत्या रक्तगटाच्या श्वानाला रक्तदान करु शकतात.

5/5

जवळपास 75 टक्के डॉबरमॅन जातीच्या श्वानाचं रक्तगट DEA4 असतो. DEA3 आणि इतर 5 रक्तगटांचे डॉग ब्रीड्स सहसा आढळत नाहीत. पण जवळपास 20 टक्के ग्रेहाऊंड जातीच्या श्वानांमध्ये DEA 3 तर 30 टक्के ग्रेहाऊंड श्वानांमध्ये DEA 5 रक्त गट आढळतो.